पाटणा (बिहार) CM Nitish Kumar Apologized : बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आज तिसऱ्या दिवशी मुख्यमंत्री नितीश कुमार विधानसभेत पोहोचताच भाजप आमदार आणि आमदारांनी त्यांना घेराव घातला. विरोधकांनी त्यांना सभागृहात येण्यापासून रोखलं. महिलांबाबतच्या त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी स्पष्टीकरण मागितलं. मुख्यमंत्र्यांनी महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह विधान केलंय, त्यामुळं त्यांना माफी मागावी लागेल, असं भाजपा नेत्यांचं म्हणणं होतं. विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला.
"माझ्या वक्तव्यानं कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. माझा कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आम्ही महिलांच्या उत्थानासाठी सातत्यानं काम करत आहोत" - नितीश कुमार, मुख्यमंत्री, बिहार
नित्यानंद राय याचं टिकास्त्र : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या वक्तव्यावर भाजपा नेते नित्यानंद राय म्हणाले की, हे अत्यंत आक्षेपार्ह विधान आहे. नितीश कुमार यांनी ज्या पद्धतीनं महिलांबाबत वक्तव्य केलंय, ते अशोभनीय आहे. या विधानानंतर तेजस्वी यादव यांनी केलेले वक्तव्यही आक्षेपार्ह आहे. नितीश कुमार आता मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नाहीत. तुम्ही या देशाची संस्कृती नष्ट केलीय. त्यांनी माफी मागून राजकारणापासून दूर राहावं, अशी घणाघाती टीका भाजपा नेते नित्यानंद राय यांनी केलीय.
- नितीश यांच्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टिका : मंगळवारी विधानसभेच्या कामकाजादरम्यान नितीश कुमार लोकसंख्या नियंत्रणावर बोलत होते. त्याचवेळी 'लग्नानंतर रात्री काय होते' यावर ते बोलू लागले. ते ज्या स्वरात बोलले आणि त्यांनी वापरलेले शब्द यावर अनेकजण टीका करत आहेत. अनेक राजकीय पक्षांबरोबरच महिला संघटनांनीही आक्षेप घेतलाय.
मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तेजस्वी यांचे स्पष्टीकरण : उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या वक्तव्याचा बचाव करताना मुख्यमंत्री खरं तर लैंगिक शिक्षणावर बोलत असल्याचं म्हटलं होतं. ते म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही. मुख्यमंत्री फक्त लैंगिक शिक्षणावर बोलत होते, जे शाळांमध्येही शिकवलं जातं," अशीही पुस्ती तेजस्वी यादव यांनी जोडली.
हेही वाचा :
- Bihar quotas hike : बिहारमध्ये आता 75 टक्के आरक्षण; लोकसभा निवडणुकीपुर्वी नितीश कुमारांची मोठी चाल
- Ashok Choudhary On Amit Shah : बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर वादग्रस्त विधान