नवी दिल्ली -महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाय उतार झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ( 9 जुलै ) दुपारी 5 वाजल्याच्या सुमारास त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ( CM Eknath Shinde Meet PM Modi In Delhi ) घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती भेट दिली आहे. या भेटीनंतर केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा विकास साधणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
"हे सरकार राज्यातील सर्व घटकांच्या हिताची" -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्याच्या प्रगतीत केंद्र शासनाच्या सहकार्याची महत्वाची भूमिका असून केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने महाराष्ट्राचा सर्वतोपरी विकास साधणार आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही सरकार स्थापन केले आहे. हे सरकार राज्यातील सर्व घटकांच्या हितांची जपणूक करण्यासाठी कार्यरत राहील. यासाठी केंद्रशासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे.