नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करुन ती राष्ट्राला समर्पित केली आहे. या कार्यक्रमावरून राजकीय वाद रंगला होता. दरम्यान, या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हजेरी लावली होती. तसेच या दोघांनी नवीन संसदेच्या इमारतीसमोर फोटो सेशनही केले.
पवित्रदिनी देशाच्या संसदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले आहे. ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, काही जणांनी त्या कार्यक्रमावर देखील बहिष्कार टाकून मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नव्या संसद भवनात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
शिंदे, फडणवीस दिल्लीत - रविवारी नवीन संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रम सोहळ्याला विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले होते. तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. यानित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील संसद भवनच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. शिंदे, फडणवीस यांनी रविवारी सकाळी दिल्लीतील महाराष्ट्र भवन येथे भेट दिली. तिथे त्यांनी वीर सावरकर यांना अभिवादन केले.
विरोधकांवर टीका - आजच्या या पवित्रदिनी देशाच्या संसदेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन झाले आहे. ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र, काही जणांनी त्या कार्यक्रमावर देखील बहिष्कार टाकून मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नव्या संसद भवनात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल, भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचे काम हे भवन नक्कीच करेल, अशी खात्री यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय ओबीसी विभाग अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राहुल शेवाळे, खासदार भावना गवळी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, खासदार हेमंत गोडसे, खासदार हेमंत पाटील, खासदार कृपाल तुमाने, खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते.
नवीन संसद भवनाचे उद्घाटन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला देखील उपस्थित होते. 970 कोटी खर्चून बांधलेल्या नवीन संसद भवनाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. नवीन संसद भवनात सर्व-धर्म प्रार्थनेचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध धर्मांच्या पुजाऱ्यांनी पारंपारिक श्लोकांचे पठण केले.
हेही वाचा -
- New Parliament Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसदेचे उद्घाटन, देशाला मिळाली नवी संसद
- PM Narendra Modi : संसदेची नवी इमारत 140 कोटी भारतीय नागरिकांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- New Parliament Building : नव्या संसद भवनाचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन, पाहा Photos