महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CM Eknath Shinde Met PM Narendra Modi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; 'या' विषयांवर चर्चा - cm eknath shinde on irshalwadi landslide

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्यासमवेत त्यांचे वडील, मुलगा खासदार डॉ श्रीकांत शिंदे, सून, नातू हे देखील उपस्थित होते. यावेळी राज्यातील अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jul 22, 2023, 2:43 PM IST

Updated : Jul 22, 2023, 3:38 PM IST

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली - एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी इर्शाळवाडी दुर्घटना- मदतकार्यावर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्यातला पाऊस, शेतकऱ्यांसाठी उपाययोजना या विषयांवर देखील चर्चा झाली आहे. धारावी प्रकल्पाची पंतप्रधानांनी आठवण काढली होती. प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावेळी चर्चा केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे पंतप्रधान म्हणाले - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

दुर्घटनाग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन - डबल इंजिन सरकारमुळे अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. इर्शाळगड दुर्घटनाग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याच्या सूचना 'सिडको'ला केल्या आहेत. अनेकजण बेघर झाले आहेत. त्यांच्यासाठी घरं बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होईल. तसेच प्रवण क्षेत्रातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

दिल्ली भेट सदिच्छा - मेट्रो, कारशेड, बुलेट ट्रेन, मराठवाडा वॉटर ग्रीडबाबत शासन गांभीर्याने काम करत आहे. जनतेच्या हिताच्या प्रकल्पांना केंद्राचे पाठबळ मिळत आहे. गृहमंत्री अमित शाह यांनाही सहकुटुंब भेटणार आहे. त्यामुळे आजची दिल्ली भेट ही सदिच्छा असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. या भेटीत माझे आजोबा संभाजी शिंदे, वडील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आई लता शिंदे, पत्नी वृषाली शिंदे आणि मुलगा रुद्रांश उपस्थित होते. आमच्या शिंदे कुटुंबाच्या चार पिढ्यांनी एकाच वेळी पहिल्यांदाच पंतप्रधान यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधला. अत्यंत व्यस्त दिनक्रम असूनही पंतप्रधान मोदी यांनी वेळ देत आमच्या सर्व कुटुंबाची आस्थेने विचारपूस केली - श्रीकांत शिंदे, खासदार

या विषयांवर झाली चर्चा - महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावेळी चर्चा केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तसेच बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत माहिती घेतली. धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे. त्याचबरोबर गरीब नागरिकांना सुखाचे आयुष्य जगता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा, रखडलेले पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावावेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे राज्यातील असे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय वारंवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे येणारी संकटे यावर आस्थेवाईकपणे चर्चा केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar Birthday : अजित पवार लवकरच होणार मुख्यमंत्री! अमोल मिटकरींचे ट्विट चर्चेत
  2. Devendra Fadnavis birthday : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे भूषण की कलंक, कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स
  3. Sanjay Raut Attack On Pm : 'मन की बात नही मणिपूर की बात करो' खासदार संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
Last Updated : Jul 22, 2023, 3:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details