बेळगावी (कर्नाटक) :गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक वाद सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा ( Home Minister Amit Shah ) यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) व मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( CM Basavaraj Bommai ) यांची सीमावादावर बैठक झाली होती. पण आता पुन्हा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादावर विधान ( CM Basavaraj Bommai reacts on border issue ) केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राचा दुसऱ्या राज्यात जाण्याचा प्रकार निंदनीय आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दारामय्या यांनी केलेल्या टीकेला त्यांनी कर्नाटकातील विधानसभेत उत्तर दिले आहे. कन्नडींना त्रास दिला तर आम्ही सोडणार नाही, असे देखील ते म्हणाले आहेत
बोम्मईंचा ईशारा : विधानसभेत नियम 69 अन्वये सीमावादावरील चर्चेत विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, दुसऱ्या राज्यात येण्याचा हा प्रकार चांगला नाही. त्यांची वृत्ती काय आहे हे जगाला कळले आहे. आम्ही आमच्या सीमांचे रक्षण करत आहोत. जर कुणी कन्नडिगांना त्रास दिल्यास आम्ही सोडणार नाही, असा संदेश दिला आहे.
बेळगावात येणे चुकीचे :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीत डीसीएम देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, तुमच्या सरकारच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात येण्याबाबत पत्र लिहायला नको होते. महाराष्ट्राचे मंत्री अशा प्रकारे बेळगावात येणे चुकीचे आहे. आमच्यापैकी कोणी येईल असे सांगितले का? त्यांना येण्यापासून रोखावे लागले. जेव्हा ते झाले नाही तेव्हा आम्ही कायद्यानुसार पत्र लिहिले. मी बरोबर आहे असे उत्तर दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्र रेकॉर्ड असल्याचा दावा : महाराष्ट्र कसा कायद्याच्या विरोधात जात यामुळे ते पत्र भविष्यात मुख्य दस्तऐवज बनेल. आहे. आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कशी धोक्यात येत आहे. हे पत्र त्यासाठी रेकॉर्ड बनले आहे. यावेळी बेळगावमध्ये महामेळाव्याला परवानगी देण्यात आली नाही. कोणत्याही कारणास्तव परवानगी देऊ नये, अशी ठाम भूमिका घेतली आहे. मात्र, खासदारांनी आम्ही येऊ, असे सांगताच ते आले तर अटक त्यांंना अटक करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कर्नाटकात घुसण्याचा प्रयत्न - महाराष्ट्रातील सुमारे 200-300 लोकांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना परत पाठवण्यात आले आहे. आता शांततापूर्ण परिस्थिती आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आम्ही आंदोलन आणि निषेधांवरही लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती कर्नाटकचे कायदा आणि सुव्यवस्था एडीजीपी आलोक कुमार यांनी दिली.