महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cloudburst In Kulgam जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये ढगफुटी, अनेक गावे जलमय - कुलगाममध्ये ढगफुटी

जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील तंगमार्ग या वरच्या भागात ढगफुटीमुळे Cloudburst In Kulgam अनेक गावे जलमय झाली आहेत. वाढत्या पाण्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. Cloudburst occurred in the upper reaches of Tangmarg Kulgam of jummu kashmir

Cloudburst occurred in the upper reaches of Tangmarg Kulgam of jummu kashmir
जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये ढगफुटी, अनेक गावे जलमय

By

Published : Aug 27, 2022, 7:05 PM IST

श्रीनगर जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील तंगमार्ग या वरच्या भागात शनिवारी ढगफुटी Cloudburst In Kulgam झाली. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी तुंबले आहे. या संदर्भात उपविभागीय दंडाधिकारी नूर आबाद बशीर उल हसन यांनी सांगितले की, जिल्ह्यातील दुर्गम गाव असलेल्या तंगमार्गच्या वरच्या भागात ढगफुटीची घटना घडली आहे.

जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये ढगफुटी, अनेक गावे जलमय

ते म्हणाले की, ढगफुटीनंतर ताबडतोब एक पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे, मात्र अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्याचवेळी घाण पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने ते खाली असलेल्या गावातील घरे व शाळांमध्ये शिरल्याचे एका स्थानिकाने सांगितले. ते म्हणाले की, वाढत्या पाण्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Cloudburst occurred in the upper reaches of Tangmarg Kulgam of jummu kashmir

हेही वाचाVideo उत्तराखंडमध्ये ढगफुटीने हाहाकार, पुराच्या पाण्यात दुमजली घरच गेले वाहून, पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

ABOUT THE AUTHOR

...view details