कुल्लू ( हिमाचल प्रदेश ) : मणिकर्ण व्हॅलीतील चोज गावात बुधवारी सकाळी ढगफुटी ( Cloud burst in Manikarn Valley ) झाली. या भीषण ढगफुटीमुळे काही घरचेही यामध्ये नुकसान झाले ( Damage to houses due to cloudburst ) आहे. याशिवाय गावाकडे जाणाऱ्या पुलाचेही नुकसान झाले आहे. याची माहिती गावकऱ्यांनी कुल्लू प्रशासनाला दिली आहे. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे.
घरांचे नुकसान: मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लूमध्ये रात्रीपासून पाऊस पडत होता. अशा स्थितीत चोज नाल्यात आज सकाळी ढग फुटले. ढगफुटीमुळे नाल्यात पाण्याचा वेग जास्त असल्याने घरांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत ६ लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. गावाकडे जाणारा एकमेव पूलही याच्या तडाख्यात आल्याने आता प्रशासनाला बचावकार्यातही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.