महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पुण्यातील १७ स्वयंसेवकांना दिला रशियन बनावटीच्या स्पुटनिक लसीचा डोस - Sputnik V vaccine trial in pune

'मागील तीन दिवसांत १७ स्वयंसेवकांना स्पुटनिक- V लसीचे डोस देण्यात आले आहे. मानवी चाचण्याच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत हे डोस दिल्याचे नोबेल रुग्णालयाचे क्लिनिकल रिसर्च विभागाने प्रमुख डॉ. एस. के राऊत यांनी सांगितले.

स्पुटनिक व्ही
स्पुटनिक व्ही

By

Published : Dec 6, 2020, 10:44 PM IST

पुणे - रशियन बनावटीच्या स्पुटनिक- V लसीचा डोस पुण्यातील १७ स्वयंसेवकांना देण्यात आला आहे. सध्या या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पुण्यातील रुग्णालयात सुरू आहेत. रशियाच्या गामालिया नॅशनल रिसर्च सेंटरने ही लस तयार केली आहे. स्पुटनिक लसीचे सुमारे १० कोटी लसीचे डोस भारताने विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे.

नोबेल रुग्णालयात दिला डोस -

'मागील तीन दिवसांत १७ स्वयंसेवकांना स्पुटनिक- V लसीचे डोस देण्यात आले आहे. मानवी चाचण्याच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत हे डोस दिल्याचे नोबेल रुग्णालयाचे क्लिनिकल रिसर्च विभागाने प्रमुख डॉ. एस. के राऊत यांनी सांगितले. पुढील काही दिवस लस दिलेल्या स्वयंसेवकांना निरिक्षणाखाली ठेवण्यात येईल. गुरुवारी (३ डिसेंबर) डोस देण्यात सुरुवात केल्याची माहिती त्यांनी दिली.

तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या होणार केईएममध्ये -

डोस देण्यासाठी स्वंयसेवक पूर्णपणे सशक्त हवे होते. त्यामुळे ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार त्यांची निवड करण्यात आली. लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या केईएम रुग्णालयात घेण्याचे नियोजित असल्याचेही दुसऱ्या एका डॉक्टरांनी सांगितले.

भारताच्या क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्रीनुसार (CTRI) सोळाशे व्यक्तींवर ही चाचणी घेण्यात येणार आहे. यात दुसऱ्या टप्प्यात १०० जण आणि तिसऱ्या टप्प्यात दिड हजार जणांना लसीचा डोस देण्यात येणार आहे. पुणे शहराशिवाय लखनऊ, जयपूर, वेल्लोर, म्हैसूर आणि पुद्दुचेरी शहरातही या लसीच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि स्पुटनिक एलएलसी मिळून लसीच्या चाचण्यांचे आयोजन करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details