कुड्डालोर (तामिळनाडू) - मित्राच्या वाढदिवसासाठी एक दहावीच्या विद्यार्थीनी केली होती. यावेळी त्याच्यासोबत वाढदिवस असलेल्या मित्राने व त्याच्या मित्राने फोटो काढले. ते फोटो घराच्यांना पाठवण्याची धमकी देत तिला घरी बोलवले व तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची घटना ( Gang Raped on Class 10 Student ) घडली आहे. या घटनेतील चार अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी पोस्को कायद्यांर्तगत अटक केली ( 4 minors arrested in POCSO ) आहे.
मित्रासोबतचा फोटो घरी पाठवण्याची दिली धमकी - कुड्डालोर जिल्ह्यातील १५ वर्षांची मुलगी सरकारी उच्च माध्यमिक शाळेत दहावीत शिकत आहे. याच शाळेत 12 वीत शिकणाऱ्या आणि परीक्षेत नापास झालेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने 22 मे रोजी मित्रांना घरी आणून वाढदिवस साजरा केला. यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्याने केक कापून वाढदिवस साजरा केला आणि मोबाईलवर मुलीसोबत फोटो काढला. त्यानंतर वाढदिवस साजरा करणारा विद्यार्थी चेन्नईत कामावर गेला. दरम्यान, विद्यार्थ्यासोबत इयत्ता 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्या मुलीला “माझ्याकडे तू त्याच्यासोबत (17 वर्षांचा मुलासोबत) वाढदिवसाच्या पार्टीत काढलेला फोटो आहे. तुझ्या घरी देईन. "तुला हे तुमच्या घरी द्यायचे नसेल तर, मी तुला बोलावतो त्या ठिकाणी यावे," तो विद्यार्थ्याला म्हणाला.
अत्याचाराचे काढले व्हिडिओ -1 रोजी शाळेच्या जेवणाच्या सुट्टीदरम्यान ती विद्यार्थीनी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या विद्यार्थ्याच्या घरी गेली. मुलगी घरात शिरताच विद्यार्थ्याने तिला धमकावत दरवाजा आतून बंद केला. तसेच आतमध्ये दहावीत शिकणारे आणखी दोन विद्यार्थी होते. त्यानंतर तिन्ही विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्याचा मोबाईल फोनवर व्हिडिओ काढला. यामुळे विद्यार्थिनीला आपल्यासोबत झालेल्या क्रूरतेबद्दल कोणाला सांगावे हे समजत नव्हते. या प्रकरणात, त्या 3 विद्यार्थ्यांनी काढलेला व्हिडिओ हा आपला चैन्नईतील मित्राला पाठवण्याचे त्यांनी ठरवले. जेणेकरून चेन्नईला कामासाठी गेलेल्या विद्यार्थ्याला तो पाहता येईल.