पटियाला(पंजाब) -पटियाला( patiala news ) येथे खलिस्तानविरोधी मोर्चात दोन गट समोरासमोर ( khalistan murdabad march clashes ) आले होते. हिंदू संघटनांनी ह्या मोर्चा काढण्याची तयारी केली होती. त्याचवेळी काही शीख संघटनांनी त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण इतके चिघळले की दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. यादरम्यान एसएचओ करणवीर यांनी शीख आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर एसएसपी नानक सिंह घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी हवेत गोळीबार केला. यानंतर वातावरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. खरे तर येथे शिवसेनेनेखलिस्तानविरोधात पुतळा जाळण्याची तयारी केली होती. हे कळताच खलिस्तान समर्थकांनी निदर्शने सुरू केली. तेथे पोलिसांनी त्यांना थांबवून परत पाठवले. मात्र, शीख संघटनांचे सदस्य तलवारी घेऊन काली माता मंदिरात पोहोचले. दोन्ही बाजूंच्या मध्ये बराच वेळ वीटा, दगडांची चकमक सुरू होती.
पटियालामध्ये कर्फ्यू (Curfew in Patiala ) - आज, 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 ते उद्या, 30 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आज येथे झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला आहे.
हाणामारी दरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार भाषणबाजी -पंजाब पोलीस आणि आम आदमी पक्षाच्या सरकारने या लोकांवर कठोर कारवाई करावी, असे हिंदू संघटनेचे नेते हरीश सिंगला म्हणाले. दुसरीकडे जसविंदर सिंग राजपुरा म्हणाले की, शीख संघटनांनी अनेक दिवसांपासून आवाहन केले होते की, काही संघटना शीख राजाच्या विरोधात वातावरण बिघडवत आहेत. प्रशासनाने या लोकांना अटक करायला हवी होती, जेणेकरून वातावरण बिघडू नये.
उपायुक्त आणि एसएसपी यांनी लोकांना आवाहन - यादरम्यान शीख आंदोलकांनी एसएचओचा हात कापल्याच्या बातम्या पसरू लागल्या. मात्र, पटियालाच्या डीसींनी याचा इन्कार केला आणि ते निराधार असल्याचे सांगितले. अशा अफवा पसरवू नका असे आवाहन त्यांनी केले. पटियाला रेंजचे आयजी राकेश अग्रवाल यांनी सांगितले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. कोणीतरी अफवा पसरवली होती, त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. एसएचओचा हात कापल्याचीही अफवा आहे. परिस्थिती पूर्णपणे शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.