पाटणा -बिहारमधील सत्ता भाजपच्या हातामधून जाण्याची शक्यात वर्तवली जात आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपसोबत असलेली युती तोडण्याची शक्यता आहे. जेडीयू लवकरच आरजेडी, डावे आणि काँग्रेसोबत सत्ता स्थापन करु शकते. त्याच पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भाजपने महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्यारुपाने सत्ता आली. पण, बिहारमधील सत्ता जाण्याच्या मार्गावर ( Cm Nitish Kumar Talks To Sonia Gandhi ) आहे.
भाजपा पक्ष फोडण्याची भिती -माजी केंद्रीय मंत्री आर. सीपी. सिंह यांच्यामुळे भाजप आणि जेडीयू यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. नितीश कुमारांनी आर. सीपी. सिंहांना राज्यसभेचे तिकीट नाकारलं होते. त्यानंतर आर. सीपी. सिंहांना पक्षाला रामराम ठोकला. मागील काही दिवसांपासून आर. सीपी. सिंह यांना भाजपने आपल्या तंबूत घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे नितीशकुमार नाराज झाले आहेत. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना घेऊन भाजपने शिवसेना फोडली. तसेच, आर. सीपी. सिंह यांना सोबत घेऊन भाजप आपला पक्ष फोडेल अशी भिती नितीश कुमारांना वाटत आहे.