नवी दिल्ली : तीन महिलांसह नऊ नवीन न्यायाधीशांना आज (31 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (सीजेआय) एन व्ही रमणा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात हे प्रथमच घडले, की नऊ न्यायाधीशांनी एकाच वेळी पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळा सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त इमारत संकुलाच्या सभागृहात पार पडला.
पारंपरिकपणे, नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ CJI च्या न्यायालयात दिली जाते. मंगळवारी नऊ नवीन न्यायाधीशांच्या शपथविधीसह सर्वोच्च न्यायालयाचे संख्याबळ 33 होते. मुख्य न्यायाधीश धरून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 आहे.
हेही वाचा-कोविडचे नवे रूप आले समोर, लसीच्या संरक्षणालाही आव्हान देणार?; तज्ञांनी व्यक्त केला अंदाज
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नऊ नवीन न्यायाधीशांना शपथ -
- जस्टिस अभय श्रीनिवास ओका (जे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते)
- न्यायमूर्ती विक्रम नाथ (जे गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते)
- न्यायमूर्ती जितेंद्र कुमार माहेश्वरी (जे सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते)
- न्यायमूर्ती हिमा कोहली (जे तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते)
- न्यायमूर्ती बी.व्ही.नागरथना (जे कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते).
- न्यायमूर्ती सीटी रविकुमार (जे केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते)
- न्यायमूर्ती एम एम सुंदरेश (जे मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते)
- न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी (जे गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते)
- पी.एस. नरसिंह (जे एक वरिष्ठ वकील आणि माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते) या सर्वांना सरन्यायाधीशांद्वारे पदाची शपथ देण्यात आली.
सप्टेंबर 2027 मध्ये न्यायमूर्ती नागरथना पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होण्यासाठी रांगेत आहेत. 30 ऑक्टोबर 1962 रोजी जन्मलेल्या न्यायमूर्ती नागरथना पूर्व प्रधान न्यायाधीश ई एस वेंकटरमैया यांच्या कन्या आहेत.
हेही वाचा-आज देशभरात साजरी होत आहे कृ्ष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सव, वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर