महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CJI DY Chandrachud: कायद्याला मानवतेचा स्पर्श असावा, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे प्रतिपादन - भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड

सर्व लोकांच्या हितासाठी कायद्याला मानवतेचा स्पर्श असला पाहिजे. समस्या दूर करण्यासाठी त्याचा वापर नेहमीच संवेदनशीलतेने करायला हवा असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी केले आहे. ते काल शुक्रवार गुवाहाटी येथील आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

CJI DY Chandrachud
CJI DY Chandrachud

By

Published : Apr 8, 2023, 3:51 PM IST

भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड गुवाहाटी येथील आयोजीत कार्यक्रमात बोलताना

गुवाहाटी (आसाम) : कायद्याला मानवतेचा स्पर्श असला पाहिजे आणि समस्यांचे मूळ काढून टाकण्यासाठी त्याचा वापर नेहमीच संवेदनशीलतेने व्हायला हवा, असे प्रतिपादन मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी केले आहे. ते गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या 'प्लॅटिनम ज्युबिली' सोहळ्यात बोलत होते. तसेच, कायद्याने ज्या समुदायांवर त्याची अंमलबजावणी करायची आहे त्यांची वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे असही न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले आहेत.

विविधतेबद्दल सहानुभूती आणि आदर असायला हवा : कायद्याचा समंजसपणे अर्थ लावला जातो आणि त्याची अंमलबजावणी केली जाते तेव्हा लोकांचा समाजरचनेवर विश्वास निर्माण होतो आणि ते न्यायाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकते. म्हणूनच नेहमी 'कायद्याला मानवतेचा स्पर्श असला पाहिजे असही ते म्हणाले आहेत. कायदा सर्वांच्या हिताचा असेल याची खात्री करण्यासाठी हा मानवी स्पर्श आवश्यक आहे असही ते म्हणाले आहेत. त्याचसोबत समानता आणि विविधतेबद्दल सहानुभूती आणि आदर असायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

कायद्याने सर्वांच्या समस्या सुटाव्यात हीच मुळ अपेक्षा : सर्व लोकांच्या हितासाठी कायद्याला मानवतेचा स्पर्श असला पाहिजे. समस्या दूर करण्यासाठी त्याचा वापर नेहमीच संवेदनशीलतेने करायला हवा. जेव्हा कायद्याचा समंजसपणे अर्थ लावला जातो आणि त्याची अंमलबजावणी केली जाते, तेव्हा लोकांचा सामाजिक रचनेवर विश्वास असतो आणि ते न्यायप्राप्तीच्या दिशेने एक पाऊल असते. असे बोलताना कायद्याने सर्वांच्या समस्या सुटाव्यात हीच मुळ अपेक्षा असते असही ते म्हणाले आहेत.

कायदा तत्त्वाशिवाय चालतो तेव्हा तो मनमानीपणाचा फटका बसण्याची शक्यता : सरन्यायाधीशांनी न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर भर दिला. ते म्हणाले की, न्यायव्यवस्थेची वैधता ही नागरिकांकडून मिळणाऱ्या विश्वासात असते. ते म्हणाले की, लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. कायदा सर्व लोकांच्या गरजा पूर्ण करतो याची खात्री करण्यासाठी कायद्याचा मानवी स्पर्श आवश्यक आहे. जेव्हा कायदा तत्त्वाशिवाय चालतो तेव्हा तो मनमानीपणाचा फटका सहन करू शकतो असे निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदवले आहे.

हेही वाचा :जगात गाजा वाजा ; जाणून घ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा इतिहास

ABOUT THE AUTHOR

...view details