महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Guwahati Airport : CISF कर्मचाऱ्याने 80 वर्षीय महिलेला कपडे उतरवण्यास सांगितले; गुवाहटी विमानतळावरील प्रकार - guawahati airport cisf constable suspended

विमानतळावर नियमित सुरक्षा तपासणी दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) कर्मचार्‍यांनी 80 वर्षीय अपंग नागा महिलेला विवस्त्र केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी गुवाहाटी येथील लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय (LGBI) येथे घडली.

Guwahati Airport
Guwahati Airport

By

Published : Mar 25, 2022, 12:22 PM IST

गुवाहाटी (आसाम) - विमानतळावर नियमित सुरक्षा तपासणी दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) कर्मचार्‍यांनी 80 वर्षीय अपंग नागा महिलेला विवस्त्र केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी गुवाहाटी येथील लोकप्रिया गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय (LGBI) येथे घडली. याप्रकरणी महिलेची मुलगी डॉली किकॉन यांनी ट्विटरवर त्यांच्या आईसाठी मदत मागितली तेव्हा ही घटना उघडकीस आली.

महिलेच्या मुलीने केले ट्विट -किकॉन यांनी ट्विट करत म्हटले की, "माझ्या 80 वर्षीय अपंग आईला गुवाहाटी विमानतळावरील CISF सुरक्षा तपासणीत कपडे काढण्यात आले. सुरक्षा कर्मचार्‍यांना तिच्या टायटॅनियम हिप इम्प्लांटचा "पुरावा" हवा होता आणि तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले. आपण वरिष्ठांशी असेच वागतो का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महिलेची मुलगी, डॉली किकॉन, एक प्रख्यात मानववंशशास्त्रज्ञ आणि लेखिका आहेत.

महिलेच्या मुलीने केलेले ट्विट

ट्विटमध्ये त्या पुढे म्हणाल्या की, "कोणीतरी कृपया मदत करा! गुवाहाटी विमानतळावरील CISF सुरक्षा दल माझ्या आईची काळजी घेत असलेल्या माझ्या भाचीला त्रास देत आहे. त्यांनी लिहिलेला तक्रार अर्ज काढून घेतला आहे. त्यांनी तिला 'परवानगी नाही' असे सांगून स्क्रीनशॉट घेऊ दिला नाही. माझी आई व्यथित आहे." त्यांच्या आईला जबरदस्तीने अंडरगारमेंट खाली खेचल्याचा आरोपही किकॉनने केला आहे. "हे घृणास्पद आहे! माझ्या 80 वर्षीय अपंग आईला तिचा अंतर्वस्त्र खाली ओढून नग्न करण्यास भाग पाडले गेले. का? का?" तिने ट्विट केले. तर त्यांच्या ट्विटला उत्तर देताना नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे उत्तर दिले.

हेही वाचा -Kejriwal On 'The Kashmir Files'...तर 'द कश्मीर फाईल्स युट्युबर टाका; केजरीवाल यांचे भाषण व्हायरल

या घटनेनंतर पाठपुरावा करण्यासाठी गुवाहाटी विमानतळ प्राधिकरण आणि CISF अधिकाऱ्यांची भेट घेतली. डीआयजी सीआयएसएफनेही फोनवर संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याबद्दल धन्यवाद, असे ट्विटही किकॉन यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details