सिलिगुडी- बागडोगरा येथे चीनी बनावटीचे सॅटेलाईट घेऊन प्रवास करणाऱ्या नागरिकाला सीआयएसएफने अटक केली. शुक्रवारी बागडोगरा विमानतळावर सीआयएसएफने झाडझडती घेतली. यावेळी थॉमस इसरोह सेईत्ज ( वय 45 ) याच्याजवळ चीन बनावटीचे सॅटेलाईट आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केले आहे. त्याच्याकडून चीनी बनावटीचे सॅटेलाईट जप्त करण्यात आले आहे. त्याचा पासपोर्ट आणि व्हिसाही पोलिसांनी जप्त केला आहे.
तीन अमेरिकन नागरिक निघाले होते दिल्लीला :बागडोरा विमानतळावरुन तीन अमेरिकन नागरिक दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. त्यामुळे सीआयएसएफच्या जवानांनी त्यांचे सामान चेक केले. यावेळी त्यांच्या सामानात चीनी बनावटीचे सॅटेलाईट असल्याचे आडळून आले. त्यामुळे त्यांना सुरक्षा दलाने या सॅटेलाईटबाबत कागदपत्रांची मागणी केली. मात्र त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाही. त्यामुळे सीआयएसएफच्या जवानांनी त्यांना अटक करुन तात्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले.
आर्मी ड्रोन प्रशिक्षणासाठी गेले होते सिक्कीमला :पोलिसांनी या प्रकरणी सीआयएसएफच्या जवानांच्या तक्रारीवरुन या अमेरिकन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्यासह त्याच्या आणखी एका साथिदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे तिघेही एका अमेरिकन कंपनीचे कर्मचारी असल्याचे पुढे आले आहे. ही कंपनी सॅटेलाईट कंपनी कार्गोमधून हे सॅटेलाईट फोन इतर देशात पुरवठा करते. हे अमेरिकन नागरिक 12 जानेवारीला भारतात आले होते. त्यानंतर ते सिक्कीममधील लाचूंगला आर्मी ड्रोन प्रशिक्षणासाठी गेले होते.
सॅटेलाईट फोन घेऊन प्रवास करता येत नाही :विमान प्राधिकरणाच्या नियमानुसार कोणत्याही नागरिकाला सॅटेलाईट फोन घेऊन विमान प्रवास करता येत नाही. फक्त बीएसएनएलच्या सॅटेलाईट फोनला यातून मुभा देण्यात आली आहे. मात्र या अमेरिकन नागरिकांनी सॅटेलाईट फोन घेऊन प्रवास करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यातील एका प्रवाशाला अटक करण्यात आल्याची माहिती बागडोरा पोलीस ठाण्याचे अधिकारी निर्मल दास यांनी दिली. पुढील चौकशी सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले.