ICSE and ISC Exam Result 2023 : आज दुपारी तीन वाजता कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स, (सीआयसीएसई) (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) (ICSE)आणि आयएससी (बारावी) (ISC) च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. हा निकाल बोर्डाच्या cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर जारी केला जाईल. आयसीएसई दहावीची परीक्षा ही 27 फेब्रुवारी 2023 ला झाली होती. तर 29 मार्चपर्यंत दहावीचे पेपर चालू होते. तसेच 12 वी आयएससीची परीक्षा ही 13 फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती आणि 31 मार्च रोजी ही परीक्षा संपली होती. यावर्षी 10 वी आणि 12 वीसाठी साधारण 2.5 लाख उमेदवारांनी सीआयएससीईची परीक्षा दिली.
कधी जाहीर होणार निकाल : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) आज दुपारी 3 वाजता 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर करेल. विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट cisce.org, SMS आणि DigiLocker द्वारे पाहू शकतात. निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र त्यांच्याकडे ठेवावे कारण प्रवेशपत्रावर दिलेल्या तपशिलांवरूनच तुम्ही तुमचा निकाल पाहू शकाल.
कुठे पाहणार निकाल : निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी आपला निकाल अधिकृत वेबसाइटवरुन डाऊनलोड करू शकतील. अधिकृत वेबसाइटशिवाय विद्यार्थी आपला सीआयसीएसईचा निकाल डिजीलॉकरमध्येही पाहू शकतील. विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळाशिवाय डिजीलॉकरमधून निकाल मिळवू शकतात. विद्यार्थी येथून आपले मार्कशीट म्हणजेच गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) डाऊनलोड करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांकडे डिजीलॉकर हे अॅप्लीकेशन नाही त्यांनी हे अॅप्लीकेशन प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करून घ्यावे. किंवा digilocker.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला ओळख क्रमांक म्हणजे (युआयडी) आणि इंडेक्स नंबर सारख्या तपशीलासह लॉग इन करा.