हैदराबाद Cinema Festival at Ramoji Film City :येथील जगप्रसिद्ध रामोजी फिल्मसिटीमध्ये आज गुरुवार दि १३ ऑक्टोबरपासून भारतीय चित्रपट महोत्सव सुरू झाला. देशातील चित्रपट सृष्टीला ११० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. चित्रपटाची परंपरा सिनेमॅटिक मनोरंजन आणि कार्निव्हल परेड असा मनोरंजनाचा खजिना यानिमित्तानं येथे येणाऱ्या पर्यटकांना अनुभवता येणार आहे. 12 तारखेच्या रात्रीपासून सुरू झालेला हा अभूतपूर्व उत्सव 46 दिवस चालणार आहे. रामोजी फिल्म सिटी, पर्यटकांचं यानिमित्तानं, चमचमत्या दुनियेत सजवलेल्या सौंदर्यपूर्ण वातावरणात स्वागत करत आहे.
भारतीय चित्रपटाची 110 वर्षे -पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामोजी फिल्म सिटीमध्ये भारतीय चित्रपटाची 110 वर्षे साजरी करण्यात येत आहेत. यानिमित्तानं रामोजी फिल्म सिटीला नविन रुपडं आलं आहे. रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, येथील वैशिष्ठ्यपूर्ण कारंजे आणि विविध खेळ फिल्मसिटीला भेट देणाऱ्या सर्वांनाच भुरळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यातून एक नवीन अनुभूती मिळणार आहे. फिल्मसिटीमध्ये नेहमीच विविध प्रकारच्या गुणदर्शनाचं प्रदर्शन प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनाबरोबरच प्रत्येक वळणावर आश्चर्याने मंत्रमुग्ध करून ठेवते. फिल्मसिटी कार्निवल परेड ही एक पर्यटकांच्यासाठी अनोखी पर्वणीच ठरत आहे. निसर्गरम्य मार्गांवरून ही परेड जेव्हा सुरू होते. तेव्हा ती पाहणाऱ्यांना दुसऱ्या जगात घेऊन जाते.
सिनेमॅटिक मनोरंजनाचा आनंद -नेहमीच पर्यटकांची वर्दळ असलेल्या फिल्मसिटीमध्ये या सिनेमॅटिक मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी जगभरातून लोक येत आहेत. या भागातील दोन तेलुगु राज्यांव्यतिरिक्त महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि उत्तर भारतातील विविध भागांतून लोक नवीन अनुभूती घेण्यासाठी येत आहेत. पक्षी उद्यान, धबधबे, महाकाय पाळणे, इलेक्ट्रिक ट्रेन राईड, घोडेस्वारी पाहून लहान मुलं खूपच आनंदी होत आहेत, असं मुलांनी सांगितलं.