हैदराबाद -गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिसांनी कोठडीत आपल्या मारहाण केल्याचा दावा वायएसआर काँग्रेसचे खासदार के रघु रामकृष्ण राजू यांनी केला आहे. शनिवारी आंध्र प्रदेश हायकोर्टाच्या न्यायाधीशांसमोर त्यांनी हे सांगितले. रघु रामकृष्ण राजू यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळेरमेश हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.
के रघु रामकृष्ण राजू यांच्याविरोधात सीआयडीने 14 मे रोजी मंगलागिरी येथे गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा आंध्र प्रदेश पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) रामकृष्ण राजू यांना देशद्रोहासह विविध आरोपाखाली अटक केली. हैदराबादमधील आपल्या निवास्थानी ते आपला वाढदिवस साजरा करत होते. तेव्हा त्यांना सीआयडीने अटक केली. रघु रामकृष्ण राजू यांची जामीन याचिकाही उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी सकाळी खासदार रघु रामकृष्ण राजू यांची कित्येक तास चौकशी करण्यात आल्याची आहे. यात त्यांनी जामीन मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आणि त्यांना कनिष्ठ न्यायालयाकडे जाण्यास सांगितले. राजू यांच्यावर भाषणांद्वारे समाजात तणाव निर्माण केल्याचा आरोप आहे.