महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Christman 2022 : 'ख्रिसमस डे' साजरा करण्यामागे नेमके काय आहे कारण? जाणून घ्या... - ख्रिसमस डे साजरा करण्यामागे

येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात झाला, हे इतिहासात कुठेच नमूद केलेले नाही. तरी, दर वर्षी २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस 'नाताळ' (ख्रिसमस) (Christmas 2022) म्हणून पाळला (reason behind celebrating Christmas Day) जातो. Natal

CHRISTMAS 2022
ख्रिसमस डे

By

Published : Dec 4, 2022, 3:59 PM IST

'ख्रिसमस' (Christmas 2022) हा ख्रिश्चन धर्माचा सर्वात महत्वाचा सण आहे. ख्रिसमसला ख्रिश्चन धर्माचे नवीन वर्ष देखील म्हटले जाते. बऱ्याच काळापासून ख्रिसमस केवळ पाश्चात्य आणि ख्रिश्चन बहुल देशांमध्ये मर्यादित होता. पण आता तो भारतासह इतर अनेक देशांमध्ये साजरा (reason behind celebrating Christmas Day) केला जातो. Natal

सर्वात महत्वाचा सण आहे : ख्रिसमस डे दरवर्षी 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. पण ख्रिसमसच्या उत्सवाची सुरुवात एक दिवस अगोदर म्हणजेच २४ डिसेंबरपासून सुरू होते. ख्रिस्ती धर्माचे लोक हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. बर्याच काळापासून, ख्रिसमस केवळ पाश्चात्य आणि ख्रिश्चन प्रभुत्व असलेल्या देशांमध्ये मर्यादित होता. पण आता भारतात ख्रिश्चन धर्मासह सर्व धर्माचे लोक ते साजरे करतात.

ख्रिसमस डे

येशू ख्रिस्ताचे स्मरण केले जाते :ख्रिसमस हा सण, 24 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरु होतो. लोक प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जातात. ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या आराध्य येशू ख्रिस्ताचे स्मरण करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबरला ख्रिसमसचा दिवस साजरा केला जातो.

ख्रिसमसचा दिवस महत्त्वाचा: ख्रिसमस डे साजरा करण्यामागील श्रद्धा ही आहे की, देवाने आपल्या मुलाला पापातून मुक्त करण्यासाठी पाठवले. असे म्हटले जाते की, येशू ख्रिस्ताने लोकांना त्यांच्या पापांपासून मुक्त करण्यासाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिले.

ख्रिसमस डे चा इतिहास: ख्रिसमस डे चा इतिहास शतकानुशतके जुना आहे. असे मानले जाते की, रोम देशात प्रथमच ख्रिसमसचा दिवस साजरा करण्यात आला. २५ डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा वाढदिवस किंवा नाताळचा सण म्हणून साजरा केला जातो. ख्रिसमसला ख्रिश्चन धर्माचे नवीन वर्ष देखील म्हटले जाते.

ख्रिसमस चा अर्थ काय : नाताळ हा शब्द 'नातूस' म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला 'ख्रिसमस' असे इंग्रजीत म्हणतात. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ (Christ Mass). सहाव्या शतकात धर्मगुरूंना नाताळच्या दिवशी तीन ख्रिस्तमहायज्ञ (मिस्सा) अर्पण करण्याची परवानगी देण्यात आली होती. ख्रिस्ताच्या जन्मघटकेचे स्मरण करण्यासाठी पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जाई. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला असे मानतात. दूसरा मिस्सा पहाटे आणि तिसरा मिस्सा दिवसा अर्पण केला जाई. अशा प्रकारे नाताळच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याच्या प्रथेचा उगम बेथलेहेम येथे झाला. मध्यरात्रीचा मिस्सा बेथलेहेम येथे अर्पण केला जाई. हे एक छोटेसे गाव आहे. येथे ख्रिस्ताचा जन्म झाला. तेथून मग लोकांची मिरवणूक निघत असे. ती जेरूसलेम येथे पहाटे पोहोचत असे. मिरवणूक जेरूसलेमला पोहोचल्यावर तेथे दूसरा मिस्सा अर्पण केला जात असे. दिवस उजाडल्यावर त्याच शहरातील महामंदिरात सर्व ख्रिस्ती लोक जमा होत आणि मग तेथे तिसरा मिस्सा अर्पण केला जात असे. Natal

ABOUT THE AUTHOR

...view details