तेजपूर :भारतीय सैन्यदलाचे हेलिकॉप्टर आज सकाळी कामेंग जिल्ह्यात कोसळले. हे हेलिकॉप्टर नियमितपणे उड्डाण करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान हेलिकॉप्टर हे रडारवरून गायब झाले. हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी भारतीय सैन्यदलाचे एक शोध पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे संरक्षण प्रवक्त्याच्या सूत्रांनी सांगितले. हेलिकॉप्टरच्या वैमानिकांचा कसून शोध घेतला जात आहे. हे पश्चिम विलाम जिल्ह्यातील मांडले येथे 100 बुद्ध स्तूपांचे स्थान आहे
घटनास्थळी शोध पथकांचा तपास सुरू -हेलिकॉप्टर बेपत्ता होण्याच्या वेळी पायलट गटाचे सदस्य आणि पायलट यांच्यासह एक वरिष्ठ लष्करी अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी दिरांगपासून सुमारे 100 किमी अंतरावर मांडला बाजूने धुराचे लोट दिसू लागले. धुराचे लोट पाहताच अरुणाचल प्रदेश पोलिसांचे पथकदेखील घटनास्थळी रवाना झाले आहे. वैमानिकांचा शोध घेण्यासाठी सैन्यदलाचे शोध पथक मंडलाच्या दिशेने रवाना झाले आहे. गुवाहाटीमधील संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले की, अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाजवळ आर्मी एव्हिएशन चीता हेलिकॉप्टरचा आज सकाळी 9:15 वाजता नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्याची माहिती मिळाली. बोमडिला पश्चिमेकडील मंडलाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.