भोपाळ :राजधानीतील मदर इंडिया कॉलनी ( Mother India Colony ) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहजहानाबाद परिसरात बुधवारी रात्री उशिरा क्लोरीन गॅसच्या टाकीतून गळती सुरू (Bhopal chlorine gas leakage) झाली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे लोक घराबाहेर पडले. एका महिलेसह ३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सुमारे तीन तास लोक घराबाहेर राहले आहेत.
Gas leak : गॅसची गळती; एका महिलेसह ३ जणांना रुग्णालयात केले दाखल - एका महिलेसह ३ जणांना रुग्णालयात दाखल
भोपाळमधील इदगाह हिल्स वॉटर फिल्टर प्लांटच्या आजूबाजूच्या परिसरात बुधवारी संध्याकाळी अचानक उग्र वास पसरल्याने लोकांच्या डोळ्यांत जळजळ होऊ लागली. बुधवारी रात्री क्लोरीन गॅसच्या टाकीतून गळती (Bhopal chlorine gas leakage) सुरू झाली, त्यानंतर लोक घराबाहेर पडले. एका महिलेसह ३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उच्च क्लोरीन सामग्रीमुळे गॅस गळती : भोपाळच्या इदगाह हिल्समध्ये स्थित एक म्युनिसिपल वॉटर फिल्टर प्लांट आहे. येथे क्लोरीन गॅस टाकी देखील आहे. भोपाळचे जिल्हाधिकारी अविनाश लावनिया यांनी सांगितले की, संध्याकाळी 6 नंतर लोकांच्या डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर लोक घराबाहेर पडले. वृद्ध महिला लक्ष्मीला अधिक त्रास झाला. पाण्यात क्लोरीनचे प्रमाण जास्त असल्याने तेथे वायू पसरू लागला. यानंतर त्यांना हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन जण हमीदिया हॉस्पिटलच्या इमर्जन्सीमध्ये पोहोचले होते, त्यांना मेडिकल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे.
परिस्थिती नियंत्रणात आहे :पाण्यातील क्लोरीनचे प्रमाण वाढल्याचे महापालिका आयुक्त केव्हीएस चौधरी कोलसानी यांनी सांगितले. आता परिस्थिती नियंत्रणात असून महामंडळाचे कर्मचारी परिस्थिती हाताळत आहेत.