चित्रकूट -उत्तर प्रदेशातील ( Uttar Pradesh ) चित्रकूट जिल्ह्यात आज सकाळी अतिशय वेगाचा कहर पाहायला मिळाला आहे. मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात ( hospital ) दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ( police ) घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Chief Minister Yogi Adityanath ) यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत.
Accident : पिकअपच्या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू, CM योगींकडून शोक व्यक्त - चित्रकूट बातम्या
चित्रकूटमध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेल्या ग्रामस्थांना एका अनियंत्रित पिकअपने तुडवले आहे. या अपघातात घराबाहेर झोपलेल्या 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातावर मुख्यमंत्र्यांनी ( Chief Minister Yogi Adityanath ) शोक व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रकूट जिल्ह्यातील झाशी- मिर्झापूर राष्ट्रीय महामार्गावर भरतकुप पोलीस स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गावकऱ्यांना टोमॅटोने भरलेल्या अनियंत्रित पिकअपने तुडवले आहे. या अपघातात 6 गावकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.