नवी दिल्ली - लोक जनशक्ति पार्टी (LJP) अध्यक्ष चिराग पासवान यांना रालोआच्या बैठकीसाठी अन्य नेत्यांसोबत बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र प्रकृती बरी नसल्याने चिराग पासवान एनडीएच्या बैठकीसाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. लोजपा सुत्रांकडून ही माहिती देण्यात आली.
संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी एनडीए नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. एनडीएचा घटक पक्ष असल्याने चिराग पासवान यांनाही बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ते बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी एनडीए नेत्यांची ही महत्वपूर्ण बैठक आहे.