गांधीनगर -गुजरात सरकारने निवडूंग प्रवर्गातील 'ड्रॅगन फ्रूट'चे नाव बदलून टाकले आहे. या फळाला आता 'कमलम' असे अधिकृत नाव देण्यात आले आहे. शहरे, विद्यापीठ आणि गावांची नावे बदलण्याची मागणी होत असल्याचे आत्तापर्यंत ऐकलं होते. मात्र, गुजरात सरकारने धाडसी निर्णय घेत फळाचेच नाव बदलले आहे. हे नाव चीनशी संबधित वाटत असल्याने आम्ही बदलल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या गुजरातमधील कार्यालयाचे नावही 'कमलम' आहे.
कमळासारखे दिसत असल्याने नाव बदलले -
ड्रॅगन हे नाव फळासाठी योग्य वाटत नाही. हे फळ कमळासारखे दिसते. त्यामुळे या फळाचे नाव आजपासून कमलम असे ठेवण्यात येत आहे, अशी घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केली. गुजरात सरकारने या फळाचे नाव बदलल्यानंतर या नावाच पेटंटही दाखल केला आहे. तर या फळाला कमलम म्हणण्यास सुरूवात केली आहे. गुजरातचे फलोत्पादन विकास धोरण जाहीर करताना मुख्यत्र्यांनी ही घोषणा केली.