नवी दिल्ली : चीन आपल्या कारवायांना आवर घालत नाहीये. कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चा ( Corps Commander level talks ) सुरू असतानाही, चिनी लढाऊ विमाने ( Chinese Fighter Jets ) पूर्व लडाखमध्ये ( LAC in Eastern Ladakh ) तैनात असलेल्या भारतीय सैन्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत ( Chinese fighter jets flying close to LAC ) आहेत. गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून चीनची लढाऊ विमाने नियमितपणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) उड्डाण करत आहेत. या प्रदेशातील भारतीय संरक्षण यंत्रणेची तपासणी करण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे.
भारतीय हवाई दलही तयार आहे आणि परिस्थितीला अतिशय जबाबदारीने उत्तर देत आहे. भारतीय हवाई दल या धोक्याचा सामना करण्याची एकही संधी सोडत नाही. त्याच वेळी, ही आक्रमकता कोणत्याही प्रकारे संघर्षाच्या रूपात वाढू देत नाही. सरकारी सूत्रांनी सांगितले की, चीनची J-11 सह इतर लढाऊ विमाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून उड्डाण करत आहेत. अलिकडच्या काळात, 10 किमी त्रिज्या असलेल्या या भागात आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उपायांचे उल्लंघन केल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
या प्रक्षोभक कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने जोरदार पावले उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय वायुसेनेने मिग-29 आणि मिराज 2000 सह सर्वात शक्तिशाली लढाऊ विमाने प्रगत तळांवर पाठवली आहेत. या तळांवरून भारतीय हवाई दलाची विमाने काही मिनिटांत चिनी कारवायांना चोख प्रत्युत्तर देऊ शकतात. पीपल्स लिबरेशन आर्मी लडाख सेक्टरमध्ये भारतीय हवाई दलाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या कामांवरून तणावात असल्याचे दिसते. आता भारतीय हवाई दल त्यांच्या नियंत्रणाखालील भागात चिनी हालचालींवर बारीक नजर ठेवू शकते.