महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चायना मेड ड्रोन सीमेवर ठरताहेत डोकेदुखी; हत्यारे आणि अमली पदार्थांची तस्करी वाढली

जम्मूमध्ये दहशतवाद विरोधी मोहीम हाती घेतल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना हत्यारे आणि दारू गोळ्याची कमतरता भासू लागली होती. मात्र, ड्रोनच्या माध्यमातून तस्करी सुरू झाल्याने त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात रसद पुरवठा होऊ लागला आहे. परिणामी लष्कराची डोकेदुखी वाढू लागली आहे.

China-made drones n
चायना मेड ड्रोन सीमेवर ठरताहेत डोकेदुखी

By

Published : Nov 29, 2020, 10:52 PM IST

नवी दिल्ली - चीनसोबत तणावाचे वातावरण असतानाच पाकिस्तानकडून आंतराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर 'मेड-इन-चायना' ड्रोन भारतीय लष्करासाठी डोकेदुखी ठरत आहेत. जम्मू-कश्मीर आणि सीमावर्तीभागात हत्यार आणि अमली पदार्थांची तस्करी हिवाळ्यात थांबली जाते. कारण या ठिकाणी होणारी बर्फवृष्टीमुळे अनेक भागात 40-50 फुटापर्यंत बर्फाचा थर जमा होतो. त्यामुळे शत्रुराष्ट्रांकडून या कामासाठी आता ड्रोनचा वापर केला जात आहे.

हत्यार आणि अमली पदार्थाची तस्करी सोपी-

ड्रोनच्या माध्यमातून काश्मीरमध्ये हत्यारांची तस्करी करणे सोयीचे झाले आहे. त्यामुळे दहशती कारवायांना हत्यारे आणि अमली पदार्थ तस्करांना ड्रोनमुळे हत्यारे आणि अमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. अमली पदार्थ विक्रीतून मिळणारा निधी हा दहशती कारवाईसाठी वापरला जातो.

जम्मूमध्ये दहशतवाद विरोधी मोहीम हाती घेतल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना हत्यारे आणि दारू गोळ्याची कमतरता भासू लागली होती. मात्र, ड्रोनच्या माध्यमातून तस्करी सुरू झाल्याने त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणात रसद पुरवठा होऊ लागला आहे. परिणामी लष्कराची डोकेदुखी वाढू लागली आहे.

हेक्सापॉवर ड्रोन बाजारात सहज उपलब्ध

या तस्करीसाठी शुत्रराष्ट्रांकडून वापरण्यात येणारे हेक्सापॉवर ड्रोन बाजारात सहज उपलब्ध होतात. ते कोणीही खरेदी करू शकते यामध्ये प्रत्येक ड्रोनच्या माध्यमातून अनेक बंदूकेा किंवा किलोपेक्षा जास्त ड्रग्स तस्करी केली जाऊ शकते. याशिवाय भारतीय सैनिकांच्या ठाव-ठिकाण्याचाही या ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध लावता येतो. त्याचा दहशतवादी कारवाया आणि घुसखोरीसाठी वापर केला जातो.

14 दहशतवादी यमसदनी -

एका आधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी सीमारेषेवर हत्यारे जप्त करण्यात आली होती. तर या वर्षी 18 नोव्हेंबरपर्यंत दोन चिनी निर्मित रायफलें, तीन एम14 / एम16 रायफले, 46-एके सीरीज आणि 58 पिस्तुल सुरक्षादलांनी जप्त केले आहेत. ही हत्यारे घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या हत्यारांव्यतिरिक्त आहेत.

यावर्षी एलओसीवर घुसखोरीचे आठ प्रयत्न हाणून पाडले आहेत. तसेच 14 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले आहे. हे स्पष्ट आहे, की हे दहशतवादी पाकिस्तानमध्यला प्रशिक्षण शिबिरामध्ये आश्रय घेतात. भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानने गुप्तपणे या दहशतवादी शिबिरांची स्थळे सुरक्षित केली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details