जयपूर : भारत जोडो यात्रेचे 100 दिवस पूर्ण झाल्याबद्दल राहुल गांधी यांनी गुरुवारी जयपूर येथे पत्रकार परिषद घेतली (Rahul Gandhi Press Conference). यावेळी त्यांनी भारत चीन मुद्यावरून सरकारचा खरपूस समाचार घेतला. राहुल गांधी म्हणाले की, चीन युद्धाच्या तयारीत आहे, मात्र देशातील मोदी सरकार ते लपवण्याचा प्रयत्न करत आहे. (china is preparing for war says rahul gandhi).
Rahul Gandhi : 'चीन युद्धाची तयारी करतो आहे तर भारत सरकार मात्र झोपलं आहे' - राहुल गांधी - भारत जोडो यात्रेचे 100 दिवस पूर्ण
जयपूरमध्ये पत्रकार परिषदेत (Rahul Gandhi Press Conference) राहुल गांधींनी (rahul gandhi in jaipur) मोठं वक्तव्य केलं आहे. चीन युद्धाच्या तयारीत असून त्याने आपल्या सीमेवर दोन हजार किमीपर्यंत कब्जा केला आहे, मात्र भारत सरकार झोपलेले आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. (china is preparing for war says rahul gandhi) (Rahul Gandhi on China)
चीनचा आपल्या सीमेवर कब्जा : राहुल गांधी म्हणाले की, "मी दोन-तीन वर्षांपासून चीन सीमेचा मुद्दा मांडतो आहे. चीनने आपल्या सीमेवर दोन हजार किमीपर्यंत कब्जा केला आहे. सरकार हे सर्व लपवत असले तरी ते लपून राहणार नाही. भारत सरकार ऐकू इच्छित नाही. सीमेवर त्यांच्या शस्त्रांची हालचाल पाहायला मिळते. चीन युद्धाच्या तयारीत आहे आणि भारत सरकार झोपलेले आहे".
सरकारचे केवळ इवेंटवर लक्ष : राहुल गांधी पुढे म्हणाले की, "देशातील सरकार केवळ इवेंट बेस काम करते ही समस्या आहे. आज कार्यक्रम इथे झाला, उद्या कार्यक्रम तिथे झाला. हे सरकार धोरणानुसार काम करत नाही". परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याचा हवाला देत ते म्हणाले की, "आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर रणनीती बनवली पाहिजे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकारच्या लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यांवर आपली समज वाढवण्याची गरज आहे. चिनी सैनिक भारतीय सैनिकांना मारहाण करत आहेत. आधी 20 सैनिक शहीद झाले. त्याबाबत केंद्र सरकार काय करत आहे? कारण जेव्हा सीमारेषेचा प्रश्न येतो तेव्हा हे इवेंट काम करत नाहीत, त्यावेळी फक्त ताकद काम करते".