बिजिंग- पूर्व लडाखमधील पँगॉग सरोवरच्या दक्षिण भागात भारतीय हद्दीत प्रवेश केलेल्या सैनिकाला तत्काळ माघारी करा, अशी मागणी चीनने केली आहे. शुक्रवारी (८ जानेवारी) पहाटे भारतीय लष्कारने चिनी जवानाला ताब्यात घेतले होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून हा जवान भारतीय हद्दीत आला असता भारतीय लष्कराने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
सीमेवरील तणावाच्या पाश्वभूमीवर जवान ताब्यात -
गेले आठ महिने पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांत संघर्ष सुरू असून चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून तोडगा निघाला नाही. सीमेवर दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणात जवान तैनात केले असून युद्धासाठीची तयारीही करण्यात आली आहे. भारताने लष्करी साधनसामुग्री, शस्त्रात्रे आणि लढाऊ विमाने सीमा परिसरात तैनात केली आहेत. सीमेवर तणाव असताना चिनी सैन्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सीमेवर एक सैनिक भरकटला असल्याचे चिनी लष्कराने मान्य केले आहे.