चंदिगड :पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गर्भातील मूल दत्तक घेण्याच्या प्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला आहे. गर्भात वाढणारे मूल दत्तक घेता येत नाही, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने दिले आहे. विशेष म्हणजे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात हा निर्णय दिला आहे.
काय आहे प्रकरणः पतियाळा येथील रहिवासी असलेल्या एका महिलेने याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये तिने दत्तक पालकांना तिचे नवजात मूल परत करण्याची मागणी केली होती. याचिकेत म्हटले आहे की, जेव्हा तिच्या पोटी मूल होते, तेव्हा एका जोडप्याने आपले मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. कागदोपत्री काम झाल्यानंतर ते तिच्या मुलाला घेऊन गेले.