चिक्कबल्लापूर Horrific Accident in Chikkaballapur : कर्नाटकातील चिक्कबल्लापूर इथं टाटा सुमोचा भीषण अपघात झालाय. या भीषण अपघातात लहान मुलांसह 12 जणांचा मृत्यू झालाय. राष्ट्रीय महामार्ग क्रं. 44 वर हा अपघात झाला आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हे प्रवासी आंध्र प्रदेशातून बेंगळुरूला जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या टाटा सुमोमध्ये 18 जण प्रवास करत होते. अपघातातील सर्व मृत आंध्र प्रदेशातील असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. आज पहाटे राष्ट्रीय महामार्ग 44 वर चिक्कबल्लापूर हद्दीत पार्क केलेल्या सिमेंट लॉरीला टाटा सुमोनं धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं समोर आलंय.
चार महिलांसह 12 जण ठार : पोलिसांनी सांगितलं की, हा अपघात चिक्कबल्लापूर शहराच्या जिल्हा मुख्यालयाच्या हद्दीत घडला. सूत्रांनी सांगितलं की, ही सुमो बागेपल्लीहून चिक्कबल्लापूरकडे जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला धडक दिली, परिणामी चार महिलांसह 12 प्रवासी जागीच ठार झाले. ते म्हणाले की, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.