महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 8, 2021, 6:27 PM IST

Updated : Dec 8, 2021, 7:27 PM IST

ETV Bharat / bharat

Bipin Rawat passes away : सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या हेलिकॉप्टरमधून (Army Chopper Crash) बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते.

बिपीन रावत
बिपीन रावत

नवी दिल्ली - माजी लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या हेलिकॉप्टरमधून (Army Chopper Crash) बिपीन रावत हे पत्नीसह प्रवास करत होते. यावेळी दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्यासह या दुर्घटनेत एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

  • अनेकांनी वाहिली श्रद्धांजली -

देशासाठी ही अत्यंत दु:खदायक बातमी आहे. संपूर्ण देश या घटनेमुळे हळहळल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh यांच्याकडून बिपीन रावत आणि अन्य मृत अधिकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

  • हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरला अपघात -

तामिळनाडूच्या कुन्नूर येथील जंगलात ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. संरक्षण खात्याने या दुर्घटनेची सर्व माहिती घेतली असून, या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय हवाई दलाने एक ट्विट करून बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

  • बिपीन रावत यांच्याबद्दल -

डिसेंबर 2019 मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्या पदावर काम करण्यासाठी संधी दिली होती. 16 मार्च 1958 मध्ये बिपीन रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एल एस रावत सैन्यात होते. लेफ्टनंट जनरल एल एस रावत म्हणून त्यांची ख्याती होती. बिपीन रावत यांचे बालपण सैनिकांच्या सहवासातच गेले. शिमल्याच्या सेंट एवडर्ड स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले.

Last Updated : Dec 8, 2021, 7:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details