पुणे :मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ( Chief Minister Shivraj Singh Chouhan ) यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी ( Chief Minister Eknath Shinde ) देखील मध्यप्रदेशात येऊन गुंतवणूकदारांना आमंत्रण ( Invitation to investors to come to Maharashtra ) द्यावे असे अवाहन केले आहे. आपण सगळे भारतीय आहोत. निकोप स्पर्धा असायला हवी. भेदभाव नको. काही उद्योग असे आहेत. जे मध्य प्रदेशात देखील आहेत. महाराष्ट्रात देखील आहेत. काही उद्योगांना मध्यप्रदेश सुट होतो. तर, काहींना महाराष्ट्र होतो असे अवाहन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची पत्रकार परिषद महाराष्ट्रातील उद्योजकांना मध्यप्रदेशात येण्याचे आवाहन -पुढचा गुंतवणुकीचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या उपस्थितीत सुरु होईल. राष्ट्रपतींच्या हस्ते त्याचे समापान होईल. काही एनआरआय, अनेक विदेशी गुंतवणूकदारांना देखील त्यासाठी आमंत्रित करण्यात आल आहे असे, मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. पुणे मुंबईच्या तुलनेत जागा मध्यप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. लोकांना लागणारी वीज पाणी, स्किल वर्कर सुद्धा मध्य प्रदेशमध्ये आहेत. ते बाहेरून आणण्याची गरज नाही. त्यामुळे पुण्यातील उद्योजकांना आम्ही आव्हान करतो. की त्याने मध्य प्रदेश मध्ये गुंतवणूक करावी. ते पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्योजकांनी मध्यप्रदेशात यावे - पुणे एक उद्योगशील शहर आहे. विशेषता पुण्यामधील ऑटोमोबाईल क्षेत्र, आयटी क्षेत्रामध्येजी प्रगती झालेली आहे. ती फार महत्त्वाची आहे. त्यामुळे या उद्योजकांना आम्ही आमंत्रित करत आहोत. पुण्यातल्या काही ऑटोमोबाईल्स, आयटी कंपनी विचारणा केलेली आहे .त्याचबरोबर सिंबायोसिस कॉलेजचा सुद्धा एक प्रोजेक्ट आहे. ऑटोमोबाईल आयटीमध्ये विशेष काही इलेक्ट्रॉनिकच्या संदर्भात चर्चा झालेली असल्याचे ते म्हणाले. आम्ही उद्योगासाठी तीनशे एकर जमीन सुद्धा आरक्षित केलेली आहे. उद्योग मध्य प्रदेशात येतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असल्याचे त्यांनी सांगितले.
एक लाख बावीस हजार जमीन आरक्षित -मध्यप्रदेश सरकारने आजही एक लाख बावीस हजार जमीन आरक्षित करून ठेवलेली आहे. उद्योजकांना आल्यानंतर की जमीन आम्ही देणार आहोत .उद्योजकासाठी लागणारी जमीन वीज पाणी, स्किल वर्कर त्याचबरोबर सुरक्षितता त्या सगळ्या गोष्टी आम्ही द्यायला तयार आहोत. त्यासाठीच आम्ही हे गुंतवणुकीचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्रातच नाही बाहेर प्रदेशातून सुद्धा गुंतवणूक आली पाहिजे .असे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज्या चव्हाण यांनी म्हटलं आहे.
मध्य प्रदेशातल्या गुंतवणूकदारांना अवाहन -फोक्सवॅगन वेदांत प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर अनेक राजकीय चर्चा झाल्या. त्यावर आज मुख्यमंत्री शिवराज्य चव्हाण यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आम्ही मध्य प्रदेश मध्ये आमंत्रित करतो. त्यांनीही मध्य प्रदेशातल्या गुंतवणूकदारांना आवाहन करावं. देशांमध्ये एक निकोप स्पर्धा व्हायला हवी. कारण भारत हा एक संघ आहे असेही, यावेळी यांनी शिवराज चव्हाण यांनी म्हटल आहे.