लखनऊ (उत्तरप्रदेश) -ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन ( senior Journalist Kamal Khan passes away ) झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण पत्रकारिता विश्वात शोककळा पसरली आहे. कमाल खान यांच्या पत्नीही रुचि कुमार याही पत्रकार आहेत. त्यांना एक मुलगाही आहे.
कमाल खान यांच्या निधनावर अनेक राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी कमाल खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी ट्विट करून कमाल खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केला व्यक्त शोक -
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि इतर नेत्यांनी कमाल खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सीएम योगी म्हणाले की, मी शोकाकुल कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. हे पत्रकारितेचे कधीही न भरून येणारे नुकसान आहे. कमल हे पत्रकारितेचे निःपक्षपाती आणि भक्कम पहारेकरी होते.