महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Indore Amalner ST Accident : इंदोर-अमळनेर एसटी बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत - Indore Amalner ST bus accident

इंदोर-अमळनेर एसटी बस ( Indore Amalner ST Accident ) अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश शिंदे यांनी एसटी महामंडळाला ( ST Corporation ) दिले आहेत.

Indore Amalner ST Accident
इंदोर-अमळनेर एसटी बस अपघात

By

Published : Jul 18, 2022, 3:09 PM IST

मुंबई -इंदूरहून जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरकडे निघालेली बस नर्मदा नदीत कोसळून 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील धार येथे ही घटना घडली. या बसमध्ये 40 प्रवासी होते. अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी केली. याबाबत तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. मध्यप्रदेशमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. तेरा लोकांचे मृतदेह मिळाले आहेत. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे. तेथील शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्र्यांशी शिवराज चौहान ( Chief Minister Shivraj Chauhan ) येथील दोन वेळा चर्चा झाली मदत कार्य करत आहे. मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत जाहीर ( 10 lakhs to the relatives of the deceased ) केली आहे.

हेही वाचा -Monsoon Session Begin Today : देशासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा - पंतप्रधान; संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. इंदोर-अमळनेर ही एसटी बस ( Indore Amalner ST Accident ) मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मृतांच्याकुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत.काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे. अशी, माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली. बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार, एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत. मी सुद्धा धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाशी संपर्कात आहे. शोध, बचावकार्य वेगाने केले जात आहे. असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. जखमींना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, इंदूरहून जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरकडे निघालेली बस नर्मदा नदीत कोसळून 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील धार येथे ही घटना घडली. या बसमध्ये 40 प्रवासी होते. नदीच्या पुलावरील कठडा तोडून ही बस नदीपात्रात कोसळली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. इंदोरहून ही बस सकाळी साडेसात वाजता निगाली होती. खलघाट अणि ठीगरीमध्ये नर्मदा पुलावर येताच या बसचा अपघात झाला. चंद्रकांत एकनाथ पाटील हे या बसचे चालक असून प्रकाश श्रावण चौधरी हे या बसचे वाहक होते.

इंदूरहून अंमळनेरला निघाली होती बस - इंदूरहून अंमळनेरकडे जाणारी महाराष्ट्र रोडवेजची बस धार जिल्ह्यातील खलघाट संजय सेतूवरून कोसळल्याने 12 जण ठार झाले आहेत. या अपघातातील १५ जणांना वाचवण्यात आतापर्यंत यश आले आहे, असे मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.

तांत्रिक अपघातामुळे अपघात -या पुलावरून जात असतानाच बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चालकाचे बसवरील सुटल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 15 जण अद्याप बेपत्ता आहेत. या अपघातग्रस्त बसला नदी बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. अपघातस्थळी एसटीचे अधिकारी रवाना झाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या शोकसंवेदना -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताची माहिती घेतली असून आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहे. पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, इंदूरहून अंमळनेरला जाणाऱ्या बसच्या अपघाताचे वृत्त धक्कादायक आहे. या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातस्थळी वेगाने कार्य सुरू असून आवश्यक ती मदत प्रशासन करीत आहे.

मुख्यमंत्री शिंदेंची मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा -राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेनंतर तातडीने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांच्याकडून या घटनेसंदर्भात माहिती घेतली.शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याबाबत सांगितले की, इंदूरहून अंमळनेरकडे येणाऱ्या बस अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. मुख्यमंत्री यासंदर्भात मध्यप्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून आहेत.

हेही वाचा -Voting For President Election Today : राष्ट्रपती पदासाठी आज मतदान; द्रौपदी मुर्मू, यशवंत सिन्हा आहेत उमेदवार

ABOUT THE AUTHOR

...view details