महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग म्हणाले,...

पंजाबचे मुख्यमंत्री बदलण्यात आले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तशा सूचना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबमध्ये हा मोठा बदल ठरणार आहे.

मुख्यमंत्री अमरिंदर सिंग
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग

By

Published : Sep 18, 2021, 3:26 PM IST

Updated : Sep 18, 2021, 7:33 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवज्योतसिंग सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातील वादाला मोठे वळण लागले आहे. काँग्रेसचे हायकमांडने मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेत राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली.

राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना अमरिंदर सिंग म्हणाले, की मी काँग्रेस अध्यक्षांशी बोललो आहे. मी राजीनामा देणार असल्याचे त्यांना स्पष्ट सांगितले. गेल्या काही महिन्यांत असे तिसऱ्यांदा घडले आहे. मला खूप अपमानास्पद वाटत आहे. भविष्यात नेहमीच राजकारणात संधी असतात. त्याबाबत मी माझ्या एकनिष्ठ समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले.

भविष्यात नेहमीच राजकारणात संधी असतात

पुढील वर्षात पंजाबमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना हटविणे ही मोठी बाब मानली जात आहे.

हेही वाचा-गावकऱ्यांची चिंता मिटणार, आता ATM मधूनही औषधं मिळणार

अमरिंदर सिंग हे आज दुपारी साडेतीन वाजता राजीनामा देणार

सुत्राच्या माहितीनुसार पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. काँग्रेसच्या विधीमंडळाची शनिवारी बैठक होणार आहे. त्यापूर्वीच पंजाबमध्ये राजकीय भूकंप झाला आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये अतंर्गत कलह-

पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. आमदार नवज्योत सिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. दोघांदरम्यान जुलै 2021 मध्ये पोस्टर्स वॉरदेखील झाले होते. अमरिंदर सिंग यांनी आपल्या जवळच्या मंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर सिद्धू यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली होती. त्यानंतर अमरिंदर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देणार असल्याच्या चर्चा फेटाळल्या होत्या. त्यानंतर दिल्लीतून सिद्धू यांना बोलावणे आले होते. आ सिद्धू यांनी सोनियांची भेट घेतली आहे. मात्र, बैठकीत काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आली नव्हती.

हेही वाचा-डिजीटल इंडिया अभियान: रेशन कार्डाशी संबंधित 'या' सेवा सेतू सुविधा केंद्रात मिळणार

पंजाबमधील राजकीय समीकरण -

पंजाब विधानसभा निवडणूक 2017 साली पार पडली होती. यावेळी 117 जागांसाठी मतदान पार पडले. 11 मार्च 2017 रोजी मतगणना केली गेल्यावर काँग्रेस पक्षाला 77 जागा मिळाल्याचे निष्पन्न झाले. अकाली दल व भाजपा युतीला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. आम आदमी पार्टीला देखील अपेक्षित यश मिळाले नाही. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत अकाली दल व भाजपाची युती तुटली आहे. शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष सोबत लढणार आहेत. यामुळं पंजाबमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजपने उत्तराखंड, गुजरात या राज्यांमधील मुख्यमंत्री बदलले आहेत.

Last Updated : Sep 18, 2021, 7:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details