पश्चिम चंपारण (बिहार): बेतिया पोलीस ठाण्यात चक्क एक कोंबडा उपनिरीक्षकाकडे न्याय मागण्यासाठी पोहोचला आहे. कोंबड्याची मालकीणही त्याच्यासोबत पोलिस ठाण्यात आली होती. तिने सांगितले की शेजाऱ्यांशी वाद झाला, त्यानंतर त्यांनी कोंबडा एकटा बसलेला पहिला आणि त्याच्यावर हल्ला केला. हा हल्ल्यात त्याचा एक पाय मोडलाय. न्याय मागण्यासाठी या महिलेने कोंबडा घेऊन योगपट्टी पोलिस ठाणे गाठले. आता हा कोंबडा न्यायाच्या आशेने तुटलेला पाय घेऊन पोलिस ठाण्यात न्याय मिळण्याची वाट पाहत आहे.
शेजाऱ्यांनी तोडला 'लेग पीस' : ही घटना योगपट्टी पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या बलुआ प्रेगवा गावातील आहे. शेजाऱ्यांनी गौरी देवीच्या कोंबड्याचा पाय तोडला. महिलेने सांगितले की, शेजाऱ्यांसोबत बराच वेळ वाद सुरू होता. काल शेजाऱ्यांनी कोंबडा एकटा पाहून त्याचा पाय मोडला. त्यामुळेच आता कोंबड्यावरून सुरु झालेली ही 'झुंज' पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचली आहे. कोंबड्याची मालकीण तिच्या कोंबड्यासह योगपट्टी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली आणि शेजाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
दोषींना सोडणार नाही: एकीकडे कोंबड्याच्या पाय तोडल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला असताना दुसरीकडे बिहारची राजधानी पाटण्याच्या जवळ असलेला फातूहा जळत आहे. त्याठिकाणी कारवाईच्या नावाखाली काय झाले हे सगळ्यांना माहित आहे. बिहारमध्ये गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. बिहारमध्ये वादग्रस्त विधानांचा महापूर आलाय. त्यावर कारवाई होत नसल्याचे विरोधक सांगत आहेत. असे असताना ज्यावेळी एका कोंबड्याच्या पाय मोडला तेव्हा पोलीस ठाण्यातील हवालदाराने हृदय विचलित झाले. दोषींना सोडणार नसल्याचे त्याने ऑफ द रेकॉर्ड सांगितले.