महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मनरेगा अंतर्गत रोजगार देण्यात छत्तीसगड अव्वल , पहिल्या पाचमध्ये 'या' राज्याचा समावेश - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात छत्तीसगड पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे.

मनरेगा
मनरेगा

By

Published : Mar 14, 2021, 8:01 AM IST

रायपूर - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात छत्तीसगड पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आहे. मनरेगाची अंमलबजावणी रोजगार निर्मितीमध्ये यंदा राज्याने नवा विक्रम रचला आहे. 2020-21 आर्थिक वर्षात भारत सरकारने 15 कोटी रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. छत्तीसगडमध्ये 16 कोटी 6 लाख 84 हजार एवढा आकडा गाठला.

ठरवलेल्या उद्दिष्टापेक्षा आतापर्यंत मनरेगाअंतर्गत 107 टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध झाला. आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अजून दोन आठवडे शिल्लक आहेत. सध्या मनरेगाची कामे राज्यभर जोरात सुरू आहेत. मनरेगाच्या अंमलबजावणीमध्ये, 107 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून छत्तीसगड देशात पहिले आहे.

पहिल्या पाचमधील राज्य -

छत्तीसगढ - 107 टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती

पश्चिम बंगाल - 105 टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती

असम - 104 टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती

बिहार - 104 टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती

ओडिशा - 103 टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती

मनरेगा कशासाठी -

'मनरेगा' ही योजना यूपीए सरकारच्या काळातील महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील गरीबांना रोजगार उपलब्ध होतो. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलसंधारण व जलसंवर्धन, दुष्काळ प्रतिबंधक कामे, कालवे, फळझाड व भूसुधार, ग्रामीण भागात बारमाही जोडरस्ते, पूरनियंत्रण, पूरसंरक्षण आदी प्रकारची कामे केली जातात. हे करताना ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना रोजगार देणे आणि त्यातून दिर्घकालीन टिकणारी कामे व त्याद्वारे सामाजिक पायाभूत सोयी उपलब्ध करुन देणे हा शासनाचा उद्देश साध्य केला जातो.

हेही वाचा -Top 10 @ 11 PM रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details