महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला, महाराष्ट्र सीमेवर दोन जवान शहीद

छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड कृत्य केले आहे. गोंदिया-महाराष्ट्र सीमेवरील चेकपोस्टवर कर्तव्य बजावत असलेल्या दोन जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. गोळीबारात दोन्ही जवान शहीद झाले.

Chhattisgarh Naxal Attack
छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ला

By

Published : Feb 21, 2023, 7:24 AM IST

राजनांदगाव (छत्तीसगड) : छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील बोर्तलाब येथे नक्षलवादाची मोठी घटना घडली आहे. चेकपोस्टवर ड्युटीवर असताना अचानक जंगलातून नक्षलवादी आले आणि त्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. या घटनेत दोन जवान शहीद झाले आहेत. राजेश सिंह राजपूत आणि ललित सम्राट अशी शहीद जवानांची नावे आहेत. राजेश छत्तीसगड पोलिसात सार्जंट होता आणि ललित छत्तीसगड सशस्त्र दलात (CAF) कॉन्स्टेबल होता. नक्षलवाद्यांनी जवानांच्या दुचाकीही जाळल्या. डीएसपी नक्षल ऑपरेशन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

भूपेश बघेल यांनी श्रद्धांजली वाहिली : राजनांदगाव येथे नक्षलवाद्यांच्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट केले की, 'राजनांदगाव जिल्ह्यातील बोरतलाब पोलिस स्टेशन परिसरात झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 2 जवान शहीद झाल्याची बातमी दुःखद आहे. आमच्या जवानांचे हौतात्म्य व्यर्थ जाणार नाही. देव त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो. आम्ही सर्व एकत्र आहोत'.

पोलिसांचा तपास सुरु :डीएसपी नक्षल ऑपरेशन अजित ओंग्रे यांनी सांगितले की, 'बोरतलाव पोलीस स्टेशन हद्दीतील बोरतलाव गोंदिया सीमेवर मोबाईल चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. या चेकपोस्टवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. दरम्यान, आज सकाळी 8.00 - 8.30 च्या सुमारास नक्षलवादी अचानक जंगलातून आले आणि त्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. त्यात 2 जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांनी मोटारसायकलही पेटवली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त फौजफाटा घटनास्थळी पाठवण्यात आला आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या किती नक्षलवाद्यांनी हल्ला केला? आणि ही घटना कशी घडली, याबद्दल पोलीस माहिती गोळा करत आहेत.'

दंतेवाडामध्ये आणखी एक घटना : राजनांदगावपाठोपाठ विजापूरमध्येही नक्षलवाद्यांनी घटना घडवून आणली आहे. येथे नक्षलवाद्यांनी दंतेवाडा जिल्ह्यातील पोलीस लाईनमध्ये तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबलची गळा चिरून हत्या केली. या घटनेची माहिती देताना एसएसपी बर्मन यांनी सांगितले की, 'मृत हेड कॉन्स्टेबलचे नाव पन्नी वेट्टी आहे. तो दंतेवाडा जिल्ह्यातील रहिवासी होता. 19 फेब्रुवारीला सुट्टी घेऊन तो विजापूर जिल्ह्यातील कडेनार येथे भावाच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी गेला होता. तिथे काल रात्री 2 वाजता नक्षलवाद्यांनी त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याची हत्या केली. ग्रामीण वेशभूषेतील नक्षलवादी गावात पोहोचले आणि त्यांनी हा हल्ला केला.'

हेही वाचा :Terrorist attack on Lal Killa : लाल किल्ल्यावरील दहशतवादी हल्ला! दोषीला फाशी होणार? कारागृह प्रशासनाने कोर्टाकडे मागितले डेथ वॉरंट

ABOUT THE AUTHOR

...view details