रायपूर -छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात आज नक्षलवादी आणि केंद्रीय राखीव पोलीस दलात ( Encounter between CRPF and Naxalites ) चकमक झाली. यात सीआरपीएफचा एक कमांडर हुतात्मा ( One Commander Martyred in Chhattisgarh ) झाला. तर एक जवान जखमी झाला आहे. सीआरपीएफच्या 168 बटालियन आणि माओवाद्यांमध्ये ही चकमक जिल्ह्यातील उसूर ब्लॉकच्या जंगल परिसरात झाली. हा परिसर राज्याची राजधानी रायपूरपासून 440 किमी अंतरावर आहे. ही माहिती विजापूरचे पोलीस अधीक्षक कमलोचन कश्यप यांनी दिली.
बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक, सुंदरराज पी यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, माओवाद्यांनी गोळीबार केला. तेव्हा सीआरपीएफ बटालियन रस्ता सुरक्षा कर्तव्यावर होती. नक्षलवाद्याच्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली. माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट एसबी तिर्की हुतात्मा झाले.