महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

birthday party snack of 80s 90s : 80 ते 90 मध्ये कसा साजरा व्हायचा वाढदिवस, आयएएस अधिकाऱ्याने शेअर केला फोटो - 80 ते 90 मध्ये वाढदिवस कॉमेंट

अवनीश शरण यांनी वाढदिवसाच्या पार्टीच्या स्नॅक्सचे छायाचित्र ट्विट ( awanish sharan tweet ) केले: IAS अधिकारी अविनाश शरण यांनी हे चित्र त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करताच, 80-90 च्या दशकातील ट्विटर वापरकर्ते सक्रिय ( comments on 80s 90s birthday ) झाले. त्यांनी कॉमेंटमध्ये त्यांच्या आठवणी शेअर करण्यास सुरुवात केली.

birthday party snack of 80s 90s
80 ते 90 मध्ये कसा साजरा व्हायचा वाढदिवस

By

Published : Apr 25, 2022, 7:33 PM IST

हैदराबाद\रायपूर- सोशल मीडियावर अनेकदा काहीतरी वेगळे शेअर करणारे छत्तीसगड बॅचचे आयएएस अधिकारी अवनीश शरण ( Chhattisgarh batch IAS officer Awanish Sharan ) यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक छायाचित्र शेअर केले आहे. जे तुम्हाला 80-90 च्या दशकाची आठवण करून ( picture of birthday party snack of 80s 90s ) देईल. या फोटोत नाष्ट्याच्या प्लेट्स ट्रेमध्ये ठेवल्या आहेत. यामध्ये समोसा, गुलाब जामुन, बिस्कीट असे पदार्थ ठेवण्यात आले आहेत. 80 - 90 च्या दशकातील मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीचे स्नॅक्स, असे या फोटोला कॅप्शन दिलेला आहे.

अवनीश शरण यांनी वाढदिवसाच्या पार्टीच्या स्नॅक्सचे छायाचित्र ट्विट ( awanish sharan tweet ) केले: IAS अधिकारी अविनाश शरण यांनी हे चित्र त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करताच, 80-90 च्या दशकातील ट्विटर वापरकर्ते सक्रिय ( comments on 80s 90s birthday ) झाले. त्यांनी कॉमेंटमध्ये त्यांच्या आठवणी शेअर करण्यास सुरुवात केली. वाढदिवसाच्या पार्टीत मिळालेल्या भेटवस्तू म्हणून कोणीतरी कलर पेन्सिल, स्केच पेन, कंपास यांचा उल्लेख केला. तर कुणाला त्या काळातील टीव्ही सिरियल्स आठवल्या आहेत. अविनाश शरण यांच्या पोस्टमुळे अनेकांना 80-90 च्या दशकाची आठवण करून दिली. काही वापरकर्त्यांना वाढदिवसाच्या पार्टीत 'आय लव्ह यू रसना' म्हणताना मोठ्या आनंदाने रसना पिल्याचेही आठवले.

वापरकर्ते झाले भावूक- एका युजरने लिहिले की, आमची इतकी सुंदर आठवण पोस्ट करून तुम्ही गुन्हा केला आहे. आम्ही किती साधे जगत होत, याची आठवण करून दिली आहे. आज आपण कुठे आहोत? या पोस्टसाठी धन्यवाद. एका यूजरने लिहिले की, त्यावेळी वाढदिवसाला दिवा लावला होता. दिवे दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वापरले जात होते. पण आज मेणबत्ती विझली आहे. एका युजरने लिहिले की, त्या वेळी केकशिवाय बर्थडे पार्टी होती. त्यावेळी त्याने कँडीचा फोटोही शेअर केला होता. अवनीश शरणच्या या पोस्टला 44 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. सुमारे 1400 लोकांनी पोस्टला रिप्लाय दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details