महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी, जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी

छत्रपती संभाजी महाराज हे थोर मराठा योद्धे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुणे, महाराष्ट्रातील पुरंदर किल्ल्यावर झाला होता. संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणे बालपणापासूनच छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते. त्यांची आज पुण्यतिथी असल्याने जाणून घेऊयात त्यांच्या काही महत्त्वाच्या बाबी.

Chhatrapati Sambhaji Maharaj Death Anniversary
छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी

By

Published : Mar 11, 2023, 9:01 AM IST

मुंबई: संभाजी महाराज केवळ दोन वर्षांचे असताना त्यांची आई सई भोंसले यांना गमावले होते. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांची आजी जिजाबाई यांनी केले. त्यांना लहानपणापासूनच राजकारणात रस होता. पुढे ते संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान बनले. लहानपणापासूनच छत्रपती शिवरायांसोबत रणांगणात राहून संभाजी महाराज युद्ध आणि मुत्सद्देगिरी या कलेत तरबेज झाले होते. त्यांनी मुघल सम्राट औरंगजेबासोबत 120 लढाया केल्या आणि त्या सर्वांमध्ये औरंगजेबाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यावेळच्या मराठ्यांचा सर्वात शक्तिशाली शत्रू असलेल्या मुघल सम्राट औरंगजेबने भारतातून विजापूर आणि गोवळकोंडाची सत्ता संपवण्यात मोठी भूमिका बजावली होती.

संभाजी महाराज पन्हाळ्याला कैदेत: १६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची तिसरी पत्नी सोयराबाई यांचा मुलगा राजाराम याला गादीवर बसवण्यात आले. त्यावेळी संभाजी महाराज पन्हाळ्याला कैदेत होते. त्याचवेळी राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी संभाजी महाराजांना मिळताच त्यानी पन्हाळा किल्ल्या ताब्यात घेतला. यानंतर 18 जून 1680 रोजी संभाजी महाराजांनी रायगड किल्लाही ताब्यात घेतला आणि राजाराम, त्यांची पत्नी जानकी आणि आई सोयराबाई यांना अटक केले.

भव्य राज्याभिषेक: त्याच वेळी, 16 जानेवारी 1681 रोजी महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर संभाजी राजांचा औपचारिक भव्य राज्याभिषेक झाला. या बातमीने औरंगजेब आणखी अस्वस्थ झाला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, औरंगजेबाला वाटले की आता तो रायगड किल्ला सहज काबीज करू शकेल. संभाजी राजांच्या शौर्याने व्यथित झालेल्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजे पकडले जाईपर्यंत डोक्यावर किमोंश (पगडी) घालणार नाही अशी शपथ घेतली होती.

रायगडवर हल्ला: दुसरीकडे राजारामांना गादी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये असंतोष होता. त्यानंतर एका पत्राद्वारे त्याने औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद अकबर याला रायगडवर हल्ला करून त्याला साम्राज्याचा भाग बनवण्याची विनंती केली. मोहम्मद अकबर हा संभाजी महाराजांच्या शौर्याशी परिचित होता. त्यामुळे त्यांनी ते पत्र संभाजी महाराजांना पाठवले. या राजद्रोहामुळे संतप्त झालेल्या छत्रपती संभाजींनी आपल्या सर्व देशद्रोही सरंजामदारांना फाशीची शिक्षा दिली. याचा फायदा घेऊन अकबराने दक्षिणेकडे धाव घेऊन संभाजी महाराजांच्या विरोधात आपली सर्व शक्ती वापरली.

संभाजी महाराज यांची हत्या :दिनांक11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने छळ करून ठार केले होते. त्यांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर मात करून संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा त्यांनी सक्षमपणे पेलली होती. औरंगजेबाला तर संभाजी महाराजांनी नामोहरम करून सोडले होते. मोठ्या प्रमाणावर सैन्य असूनही शंभुराजे औरंगजेबाच्या हातील लागत नव्हते. पण काही फितुरांनी दगा दिली आणि महाराजांना कैद झाली होती. संभाजी महाराज कधीच औरंगजेबाच्या तावडीत सापडले नसते. पण फितुरांनी स्वराज्याच्या पाठित खंजीर खुपसला होता.

हेही वाचा:Shivaji Maharaj Statue Stolen अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला आमदार रोहित पवारांनी वेधले शासनाचे लक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details