चेन्नई: चेन्नईच्या पुरसावलकम भागात मानसिक आजाराने ग्रस्त 48 वर्षीय महिला तिच्या मृत पतीच्या मृतदेहासोबत जवळपास दोन दिवस बंद घरात ( Woman Lived With Husbands Dead Body ) राहिली. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक बाबू (53) रा. पुरसावलकम आणि त्यांची पत्नी पद्मिनी (48) मानसिक आजारी असलेले दोघे एकत्र राहत होते. या जोडप्याचा मुलगा परदेशात नोकरी करतो तर विवाहित मुलगी पतीसोबत बंगळुरूमध्ये राहते.
Tamilnadu : पतीच्या मृत्यूनंतर पत्नी दोन दिवस मृतदेहासोबत राहिली, कारण जाणून घ्या - चेन्नईतील महिलेच्या पतीचा मृतदेह
तामिळनाडूतील चेन्नई येथे राहणारी एक महिला तिच्या पतीच्या मृतदेहासह दोन दिवसांपासून घरात कोंडून ( Woman Lived With Husbands Dead Body ) होती. त्यानंतर पोलिसांनी माहिती मिळताच दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढला. पहा नक्की काय घडले..

पत्नी बसली होती मृतदेहाजवळ :मुलगी आरती गेल्या दोन दिवसांपासून वडिलांना फोनवर फोन करण्याचा प्रयत्न करत होती, मात्र उत्तर मिळत नव्हते. त्यानंतर आरतीने तामिळनाडूच्या वेपेरी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दरवाजा तोडण्यात आला. तेथे अशोक बाबू विवस्त्र अवस्थेत मृतावस्थेत आढळले. तर पत्नी पतीच्या मृतदेहाजवळ बसलेली आढळली. वेपेरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय किलपौक वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी पद्मिनीला उपचारासाठी मानसिक आरोग्य रुग्णालयात पाठवले आहे.