मुंबई - आयपीएलच्या चालू हंगामातील 55 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 91 धावांनी पराभव केला. मुंबईच्या डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या. ( Chennai Super Kings beat Delhi Capitals ) प्रत्युत्तरात दिल्लीचा डाव 17.4 षटकांत 117 धावांवर आटोपला. 49 चेंडूत 87 धावांची शानदार खेळी खेळणारा डेव्हॉन कॉनवे सामनावीर ठरला.
IPL-2022 च्या 55 व्या सामन्यातसुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा 91 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ( DY Patil Sports Stadium ) चेन्नईने 20 षटकांत 6 गडी गमावून 208 धावा केल्या. यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा संघ 117 धावांवर ऑलआऊट झाला.