महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Festival News : तुळशी विवाहाच्या मुहूर्तासह पाहा नोव्हेंबर महिन्यातील सणांची संपूर्ण यादी.. - महाकवी कालिदास जयंती

जीवनात सुख-समृद्धी यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी काही जण विशेष पूजा-विधी करतात. नुकतीच दिवाळी संपली आहे. आता सगळ्यांना तुळसीविवाहाचे (Tulsi Vivah) वेध लागले आहेत. तुळशी विवाह यासह पाहा नोव्हेंबर महिन्यातील उपवास आणि सणांची संपूर्ण यादी.

Tulsi Vivah Muhurat
तुळशी विवाहाचा मुहूर्त

By

Published : Oct 30, 2022, 8:09 PM IST

तुळस विष्णूप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते. आपल्याला एखादी वस्तू देवाला अर्पण करावयाची असेल तर ती तुळशीच्या मुळापाशी अर्पण करतात. म्हणजे ती वस्तू इष्ट देवतेकडे पोहचते, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. तुळसीविवाहाच्या मुहूर्ताच्या (Tulsi Vivah Muhurat) काळात सुख-समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी विवाहित महिला तुळशीची विधीवत पूजा करतात. तुळस अर्पण केल्याशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते, असे पद्मपुराण सांगते. तुळशी विवाहानंतर घरोघरी रखडलेली शुभ कार्ये पुन्हा सुरू होतील. याशिवाय अक्षया नवमी, महाकवी कालिदास जयंती, गुरु नानक जयंती, महाकाल भैरव जयंती इत्यादीही या महिन्यात येतील.खग्रास चंद्रग्रहणही याच महिन्यात होणार आहे.

तिथि आणि मुहूर्त:पंचांगानुसार यंदा कार्तिक एकादशी ४ नोव्हेंबरला साजरी होणार आहे. कार्तिक शुक्ल द्वादशी पासून तुळशी विवाह सुरू होतात. तुळशीचे लग्न ५ नोव्हेंबरपासून सुरु होतील. विवाहाची वेळ सायंकाळची असते. ८ नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे तुळशी विवाह साजरे केले जातील. यंदा ८ नोव्हेंबरला संध्याकाळी ४ वाजून ३१ मिनिटांपर्यंत कार्तिक पौर्णिमा असणार आहे.

नोव्हेंबर 2022 मध्ये येणारे उपवास, सण, वर्धापन दिन आणि आंतरराष्ट्रीय दिवस, इत्यादी:

१. नोव्हेंबर २०२२, मंगळवार, श्रीदुर्गाष्टमी व्रत, श्री गोपाष्टमी, हरियाणा-पंजाब दिन, जागतिक शाकाहारी दिवस

२. नोव्हेंबर, २०२२, बुधवार, अक्षय नवमी व्रत, औद्योगिक सुरक्षा दिवस

४. नोव्हेंबर, २०२२, शुक्रवार, प्रबोधिनी एकादशी, देवोत्थानी एकादशी

५. नोव्हेंबर, २०२२, शनिवार, प्रदोष व्रत, कालिदास जयंती, तुलसी विवाह, जागतिक शनिदिन त्रयोदशी

६. नोव्हेंबर २०२२, रविवार, बैकुंठ चतुर्दशी, प्रदोष व्रत, कालिदास जयंती

७. नोव्हेंबर, २०२२, सोमवार, कार्तिक व्रत उद्यान, देव दिवाळी, बडा ओसा (बिहार), बाल संरक्षण दिवस

८. नोव्हेंबर, २०२२, मंगळवार, कार्तिक पौर्णिमा. खग्रास चंद्रग्रहण, पुष्कर मेळा, गुरु नानक जयंती

९. नोव्हेंबर २०२२, बुधवार, मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सुरू

११. नोव्हेंबर २०२२, शुक्रवार, सौभाग्य सुंदरी व्रत.

१२. नोव्हेंबर २०२२, शनिवार, संकष्टी चतुर्थी व्रत.

१४. नोव्हेंबर २०२२, रविवार, पंडित जवाहरलाल नेहरू जयंती, राष्ट्रीय बाल दिन. जागतिक मधुमेह दिन

१६ नोव्हेंबर २०२२, बुधवार, काल भैरव जयंती, कालाष्टमी.

१७ नोव्हेंबर २०२२, गुरुवार, लाला लजपत राय यांची पुण्यतिथी.

२० नोव्हेंबर २०२२, रविवार, उत्ताना एकादशी

२१ नोव्हेंबर २०२२, सोमवार, सोमप्रदोष व्रत.

२२ नोव्हेंबर २०२२, मंगळवार, मासिक शिवरात्री.

२३ नोव्हेंबर २०२२, बुधवार, दर्श अमावस्या.

२४ नोव्हेंबर २०२२, गुरुवार, मार्गशीर्ष महिना सुरू, गुरुतेग बहादूर शहीद दिन

२७ नोव्हेंबर २०२२, रविवार, विनायक गणेश चतुर्थी.

२८ नोव्हेंबर २०२२, सोमवार, नागपंचमी व्रत, श्री राम विवाह उत्सव, ज्योतिबा फुले जयंती, विवाह पंचमी

३० नोव्हेंबर २०२२, बुधवार, मित्र सप्तमी, नरसिंह मेहता जयंती.

ABOUT THE AUTHOR

...view details