महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Chat GPT powered Bing : मायक्रोसॉफ्ट बिंगच्या एआयसोबत चॅट जीपीटीने चॅटवर घातली बंधने

चॅट जीपीटी भविष्यात गुगलला मोठी टक्कर देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चॅट जीपीटीने अल्पवधीतच आपल्याला हवी असलेली माहिती अगदी काही क्षणातच शोधून देण्याची कामगिरी केली आहे. मात्र मायक्रोसॉफ्ट बिंग एआयसोबत चॅट जीपीटीने चॅटवर काही बंधने घातली आहेत.

Chat GPT powered Bing
संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 18, 2023, 6:09 PM IST

नवी दिल्ली : सध्या टेक दुनियामध्ये चॅट जीपीटीने धुमाकूळ घातला आहे. आपण फक्त कंमाड दिल्यानंतर काही क्षणात चॅट जीपीटी आपल्याला हवी ती माहिती देत आहे. त्यामुळे चॅट जीपीटी हे भविष्यात गुगलला चांगलीच टक्कर देणार असल्याचे दिसत आहे. मात्र जास्त लंबी चॅट सेशन झाल्यामुळे बिंग सर्चमध्ये अंडरलाईन चॅट मॉडलला गोंधळून टाकू शकतो. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने 169 पेक्षा अधिक देशात मोजक्या वापरकर्त्यांसोबत बिंग एआयचे परिक्षण सुरू केले आहे. त्यामुळे बिंग एआयसोबत चॅटवर काही प्रमाणात बंधने घातली आहेत.

50 पेक्षा जास्ट मॅसेज :मायक्रोसॉफ्टने केलेल्या सर्वेक्षणात एक टक्के चॅटमध्ये किमान 50 मॅसेज असल्याचे म्हटले आहे. त्यातही दररोज 50 चॅट टर्नवर आणि 5 चॅट सत्रानंतर कॅप असेल, असेही कंपनी स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती मायक्रोसॉफ्ट बिंगने एका ब्लॉग पोस्टमध्ये दिली आहे. चॅट सत्राच्या 5 वळणानंतर वापरकर्ते आणि सुरुवातीच्या परीक्षकांना नवीन विषय सुरू करण्यासाठी सूचित केले जाणार असल्याचेही त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

बिंग एआय झाले होते खराब :मायक्रोसॉफ्ट एआय काही युजरसाठी खराब झाले होते. त्यांमुळे कंपनीने काही निर्णय घेतले आहेत. यात प्रत्येक चॅट सत्राच्या शेवटी संदर्भ स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. संदर्भ स्पष्ट केल्यामुळे मॉडेल गोंधळणार नसल्याचे कंपनीचे मत आहे. त्यासह कंपनीला तुमचा फीडबॅक मिळत राहिल्याने एक्सप्लोर आणि डिस्कव्हरी अनुभव आणखी वाढवण्यासाठी आम्ही चॅट सत्रांवरील कॅप्सचा विस्तार करणार असल्याचेही मायक्रोसॉफ्ट कंपनीने स्पष्ट केले आहे.

169 देशात चाचणी :मायक्रोसॉफ्ट कंपनीने 169 पेक्षा अधिक देशात निवडक वापरकर्त्यांसह बिंग एआयची चाचणी सुरू केली आहे. आम्हाला सुधारण्याच्या मार्गावर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मायक्रोसॉफ्ट कंपनीने सांगितले आहे. सुरक्षितता आणि विश्वास जपताना आपल्याला वास्तविक जगाकडून शिकण्याची गरज असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे चॅट जीपीटीने आपल्या काही चॅटवर बंधने आणली असली तरी चॅट जीपीटी काही क्षणात आपल्याला हवी ती माहिती लगेच मिळवून देत आहे.

हेही वाचा : Instagram Broadcast Channels : फॉलोअर्सशी सरळ संपर्कात राहण्यासाठी नवे फिचर; फेसबुक इंस्टाग्राम, मॅसेंजरवर लवकरच ब्राडकास्ट चॅनेल

ABOUT THE AUTHOR

...view details