नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरस बलात्कार प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. आज सीबीआयने चारही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. तपास अधिकारी सीमा पाहूजा या आरोपपत्र दाखल करण्यासाठी गाजियाबादमधून हाथरसला पोहचल्या. सीबीआयकडून आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला आहे.
पीडितेच्या भाऊ आणि वहिनीला आज सीआरपीएफच्या सुरक्षेत न्यायालयात आणण्यात आले. पीडितेच्या भावाची सीबीआय पॉलीग्राफ टेस्ट करणार होती. मात्र, त्याने नकार दिला आहे. आता सीबीआय पुन्हा पीडितेच्या भावाला गुजरातला घेऊन जाऊ शकते. तिथे त्याची चौकशी केली जाईल. मानसिक स्वास्थ चाचणीही त्याची करण्यात येणार आहे.