देहरादून- कोरोनाच्या संकटात चारधाम यात्रेवर आलेले विघ्न दूर झाले आहे. कारण, नैनीताल उच्च न्यायालयाने चारधाम यात्रा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी चारधाम यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नैनीताल उच्च न्यायालयाने चारधाम यात्रा सुरू करण्याचे उत्तराखंड सरकारला निर्देश दिले आहेत. त्यानंतर उत्तराखंडने चारधाम यात्रेकरिता व्यवस्था सज्ज करण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्य सचिव डॉ. एस. एस. संधू यांच्या अध्यक्षतेखाली चारधाम यात्रा सुरक्षित, व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने पार पाडावी, याकरिता विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मुख्य सचिवांनी यात्रेदरम्यान चारही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणा सुसज्ज करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा-मोदींच्या बर्थडेला मिळणार गिफ्ट? पेट्रोल-डिझेलचे दर अर्ध्याने होतील कमी?
मुख्य सचिवांनी हे दिले निर्देश
मुख्य सचिवांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना चारधाम यात्रेतील मार्गावर रस्ते सुरक्षा, साफसफाई, गर्दीवरील नियंत्रण, आपत्कालीन व्यवस्था, कोरोना चाचणी आदी व्यवस्थेकरिता अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यात्रेतील मार्गावरील संवदेनशील क्षेत्रात रस्त्यांची कामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात्रेकरू हे मार्गाने पायीदेखील प्रवास करतात. हे लक्षात घेऊन रस्त्यांची स्वच्छता आणि सुरक्षित करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिली आहे. याचबरोबर मार्गात पिण्याची पाण्याची सुविधा, शौचालय आदी व्यवस्था करण्याचे आदेशही दिले आहेत.