चमोली : चारधाम यात्रा 2023 चा सध्या भाविकांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे. केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिलला उघडण्यात आले आहेत. त्यानंतर आता चारधाम यात्रा 2023 साठी भगवान बद्रीनाथ धामचे दरवाजे आजपासून उघडणार आहेत. सकाळी 7.10 वाजता भगवान बद्रीनाथ धामचे दरवाजे विधीपूर्वक उघडण्याची प्रक्रिया पार पडत आहेत. दरवाजे उघडण्यापूर्वी बद्रीनाथ मंदिर 20 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे. यासोबतच बद्रीनाथ धाममध्ये इतरही व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मंदिर प्रशासन समिती दरवाजे उघडण्याच्या तयारीत व्यस्त आहे.
पांडुकेश्वरवरुन बद्रीनाथ धामकडे निघाली डोली :पांडुकेश्वर येथील योग बद्री आणि कुबेर मंदिरात बुधवारी दरवाजे उघडण्याच्या संदर्भात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो महिलांनी भजनाच्या गजरात डोलीला निरोप दिला. पांडुकेश्वरहून भगवान बद्री विशाल यांच्यासह भगवान कुबेर आणि बद्रीश पंचायतीमध्ये राहणारे भगवान उद्धवजी यांची डोली बद्रीनाथ धामकडे निघाली. पांडुकेश्वर योग बद्री येथून आदिगुरू शंकराचार्यांच्या गद्दी गडू घडा देखील बद्रीनाथ धामकडे रवाना झाला. भगवान कुबेर आणि भगवान उद्धव यांची डोली बुधवारी सायंकाळी उशिरा बद्रीनाथ धाम येथे पोहोचल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
जोशीमठ येथे पार पडला गरुड छड मेळा :बद्रीनाथ मंदिर उघडण्याची तयारी पूर्ण झाल्यानंतर 24 एप्रिलला गरुडजींचे बद्रीनाथ धामकडे प्रस्थान करण्यात आले. गरुड छड मेळा असे संबोधत असून तो जोशीमठ येथील नरसिंह मंदिर मार्गावर आयोजित करण्यात आला होता. त्याच दिवशी डिमरी पंचायत लक्ष्मीनारायण मंदिर डिमरहून गडू घडा तेलाचा कलश घेऊन नृसिंह मंदिर जोशीमठ येथे पोहोचले. 25 एप्रिलला आदिगुरू शंकराचार्यांच्या गादीसह, रावल आणि ईश्वरप्रसाद नंबूदिरीजी सोबत रात्रीच्या मुक्कामासाठी गडू घडा योग बद्री पांडुकेश्वरला पोहोचले. बुधवारी सायंकाळी आदिगुरु शंकराचार्य, रावल, गडू घडा, बद्री येथील पांडुकेश्वर योग उद्धव, कुबेर यांच्यासह बद्रीनाथ धाम येथे पोहोचले.