महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'इंडिया' नाही 'भारत'! मेडिकल कमिशनच्या लोगोमध्ये बदल, धन्वंतरींचा फोटोही लावला

NMC Logo : नॅशनल मेडिकल कमिशनच्या लोगोमध्ये बदल करण्यात आले आहेत. लोगोमध्ये 'इंडिया' ऐवजी 'भारत' लिहिण्यात आलं आहे. तर लोगोमध्ये आयुर्वेदाचे जनक धन्वंतरी यांचा रंगीत फोटोही लावण्यात आला आहे.

NMC Logo
NMC Logo

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 3:24 PM IST

नवी दिल्ली NMC Logo : नॅशनल मेडिकल कमिशन अर्थात NMC च्या अधिकृत लोगोमध्ये अलीकडेच दोन बदल करण्यात आले. या बदलांमुळे नवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लोगोमध्ये हे बदल केले : पहिला बदल म्हणजे, लोगोमध्ये 'इंडिया' ऐवजी 'भारत' लिहिण्यात आलं आहे. तर दुसरा बदल म्हणजे, लोगोमध्ये आयुर्वेदाची देवता भगवान धन्वंतरी यांचा रंगीत फोटो जोडण्यात आला आहे. या लोगोवरून निर्माण झालेल्या वादावर कमिशनचं म्हणणं आहे की, भगवान धन्वंतरीचा फोटो लोगोवर गेल्या वर्षभरापासून आहे. मात्र आता तो ब्लॅक अँड व्हाइट ऐवजी कलरफुल करण्यात आला.

केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्टीकरण : या प्रकरणी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत स्पष्टीकरण दिलं. "भगवान धन्वंतरी हे भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील आयकॉन आहेत. एनएमसीच्या लोगोमध्ये त्याचं चित्र फक्त कलरफुल करण्यात आलं. भगवान धन्वंतरीचं चित्र असणं ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. देशाला आपल्या वारशाचा आणि संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे", असं ते म्हणाले.

कोण आहेत भगवान धन्वंतरी : हिंदू धर्माच्या मान्यतांनुसार, धन्वंतरी हे विष्णूंचे अवतार आहेत. समुद्रमंथनाच्या वेळी ते पृथ्वीवर अवतरले. त्रयोदशीला ते महासागरातून अवतरले, त्यामुळे दिवाळीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशी हा भगवान धन्वंतरीचा अवतार दिन म्हणून साजरा केला जातो. धन्वंतरीना आयुर्वेदाचे जनक म्हटलं जातं. त्यांना चार हात आहेत. वरच्या दोन हातांमध्ये शंख आणि चक्र धारण केलं आहे. तर इतर दोन हातांत, औषधी आणि अमृत कलश धरला आहे. धन्वंतरी यांनीच अमृताचा शोध लावला होता, असं म्हटलं जातं. त्यांची पूजा केल्यानं रोगांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्य प्राप्ती होते, अशी आख्यायिका आहे.

हे वाचलंत का :

  1. आयुर्वेदिक डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांच्याप्रमाणे समान वेतन मिळणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
  2. Allopathy or Ayurveda : ऍलोपथी की आयुर्वेद? महत्त्वाची औषधोपचार पद्धत कोणती? पुन्हा रंगला वाद!

ABOUT THE AUTHOR

...view details