महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2023, 9:15 PM IST

Updated : Aug 26, 2023, 10:48 PM IST

ETV Bharat / bharat

Chandrayaan ३ : 'चंद्रयान'वरून ठेवली बाळांची नावं; एक 'विक्रम' तर दुसरा 'प्रज्ञान'

'चंद्रयान ३' (Chandrayaan-3 Success) च्या यशाने देशात आनंदाचं वातावरण आहे. तसेच देशभरातून 'इस्त्रो'च्या वैज्ञानिकांवर कौतुकाचा वर्षाव होतोय. तर दुसरीकडे कर्नाटकातील दोन जोडप्यांनी आपल्या मुलांची नावं 'चंद्रयान'वरून ठेवलीत. एकाचं नाव 'विक्रम' तर दुसऱ्याचं नाव 'प्रज्ञान' असं ठेवण्यात आलं. (Baby Name Vikram Pragyan) (Chandrayaan 3)

Chandrayaan 3 Success
Chandrayaan 3 Success

यादगिरी(कर्नाटक) : भारताची बहुप्रतिक्षित 'चंद्रयान 3' मोहीम यशस्वी झाला. विक्रम लँडरनं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केल्यानं देशात आनंदाचं वातावरण आहे. विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर काही तासांनी 'प्रज्ञान रोव्हर' लँडरमधून बाहेर आलं. सध्या विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरनं चंद्रावर शोध घेण्याचं काम सुरू केलं. संपूर्ण जगाचं लक्ष 'इस्रो'च्या चंद्रयान 3 मोहीमेकडं लागलं होतं. (Baby Name Vikram Pragyan) (Chandrayaan 3)

'चंद्रयान 3' वरून ठेवलं बाळाचं नाव : चंद्रावर उतरलेल्या या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार असणाऱ्या पालकांनी आपल्या नवजात बाळांची नावं 'विक्रम' आणि 'प्रज्ञान' अशी ठेवलीत. कर्नाटक राज्यातील यादगिरी जिल्ह्यातील वडगेरा गावात एकाच कुटुंबात जन्मलेल्या दोन बाळांची नावं 'चंद्रयान 3' च्या मोहीमेवरून ठेवण्यात आली. बाळाप्पा आणि नगम्मा दाम्पत्याच्या बाळाच नाव 'विक्रम' असं ठेवण्यात आलं, तर निंगाप्पा आणि शिवम्मा दाम्पत्याच्या बाळाच नाव 'प्रज्ञान' ठेवण्यात आलं. विक्रम नावाच्या बाळाचा जन्म 28 जून रोजी झाला असून, प्रज्ञान नावाच्या बाळाचा जन्म 14 ऑगस्ट रोजी झालाय. 24 ऑगस्ट रोजी या दोघांचा नामकरण सोहळा थाटामाटात पार पडलाय.

'इस्रो'बद्दल कृतज्ञता व्यक्त : याबाबत पालकांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, भारताच्या 'चंद्रयान 3' च्या ऐतिहासिक यशानंतर आम्ही आमच्या बाळांची नावं ठेवण्याचा निर्णय घेतला. चंद्रयान 3 बद्दल, इस्रोबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या मुलांची नाव विक्रम तसेच प्रज्ञान ठेवलं आहे. या क्षणाला आम्ही कधीच विसरू शकरणार नाहीत.

चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग : 'चंद्रयान-3' ने 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं होतं. यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. 'चंद्रयान' उतरल्यानंतर भारतानं अवकाश क्षेत्रात नवा इतिहास रचला. इस्रोनं जाहीर केलेल्या वेळेनुसार चंद्रयान संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं होतं. बुधवारी (23 ऑगस्ट) याचा व्हिडिओ इस्रोने जारी केला होता.

हेही वाचा -

  1. Chandrayaan 3 Landing: भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठा दिवस; चंद्रयान करणार चंद्रावर लँडिंग
  2. चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर पुढील 14 दिवस का महत्त्वाचे?
  3. चंदा मामा दूरचे नसून आता चंदा मामा टूरचे, देशभरात एकच जल्लोष
Last Updated : Aug 26, 2023, 10:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details